मुंबई, २२ जानेवारी २०१९- बॉलिवूड अभिनेता आदित्य पांचोली पुन्हा एकदा वादात अडकला आहे. यावेळी मॅकेनिकसोबतच्या वादामुळे आदित्य चर्चेत आला आहे. एका कार मॅकेनिकने आदित्यविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आ. एएनआयने प्रसिद्ध केलेल्या ट्विटनुसार मॅकेनिकने आदित्यवर आरोप केला आहे की, त्याने आदित्यची कार ठीक केली होती. कामानंतर जेव्हा त्याने आदित्यकडे पैसे मागितले तेव्हा आदित्यने त्याला जीवे मारण्याची धमकी दिली.
रिपोर्टनुसार आदित्य पांचोली मॅकेनिकला २ लाख ८२ हजार १५८ रुपये देणं होता. पण जेव्हा मॅकेनिकने त्याच्याकडे पैसे मागितले तेव्हा आदित्य त्याच्यावर ओरडायला लागला.
Mumbai: Complaint registered against actor Aditya Pancholi at Versova Police Station by a car mechanic for allegedly threatening to kill him when he asked for a payment of car repair charges of Rs 2,82,158. Investigation underway. pic.twitter.com/T3uRIph7TM
— ANI (@ANI) January 21, 2019
स्पॉटबॉय वेबसाइटमध्ये आलेल्या वृत्तानुसार, मॅकेनिक म्हणाला की, सुरुवातीला आदित्यने पैसे वेळेवर देण्याचं पक्क केलं होतं. मात्र जेव्हा त्याने आदित्यला फोन केला तेव्हा आदित्याने मॅकेनिकला उडवा उडवीची उत्तरं दिली.
याप्रकरणी आदित्यकडून कोणतीही प्रतिक्रिया अजूनपर्यंत मिळालेली नाही. वाद आणि आदित्य या जणू एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. कंगना रणौतने केलेल्या आरोपांमुळेही तो चर्चेत आला होता. आदित्यने कंगनावर अत्याचार केल्याचे आरोप तिने केले होते.
तसंच २०१५ मध्ये मुंबईतील एका पबमध्ये भांडण केल्यामुळे त्याला अटक करण्यात आली होती. या भांडणाची सुरुवात पबमध्ये वाजवण्यात आलेल्या गाण्यामुळे झाली. तिकडे खूप वेळ इंग्रजी गाणी वाजवण्यात येत होती. आदित्यने डीजेला हिंदी गाणी लावण्यास सांगितले. यातच दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि भांडण वाढत गेले. यानंतर आदित्यला अटक करण्यात आली. मात्र दुसऱ्याच दिवशी त्याला जामिनावर सोडण्यात आलं.
'मला विकू नका' : डोळ्यात पाणी आणणारा दुष्काळी भागातला Ground Report