निवडणूक आयोगाविरोधात बोलणं प्रकाश आंबेडकरांना भोवलं, दिग्रसमध्ये गुन्हा दाखल

निवडणूक आयोगाविरोधात बोलणं प्रकाश आंबेडकरांना भोवलं, दिग्रसमध्ये गुन्हा दाखल

  • Share this:

दिग्रस, 4 एप्रिल : भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना निवडणूक आयोगाविरोधात विधान करणं चांगलंच भोवलं आहे. ''निवडणूक आयोग म्हणतं पुलवामा घटनेवर तुम्ही बोलायचं नाही. आम्ही बोलू, करण संविधानानं आम्हाला बोलण्याचा अधिकार दिला आहे. निवडणूक आयोग हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं आहे. आमची सत्ता आल्यास निवडणूक आयुक्ताला जेलमध्ये टाकू'', असे विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं होतं. या विधानाची निवडणूक आयोगानं गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात दिग्रस (यवतमाळ) पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वंचित बहुजन आघाडीची बुधवारी (3 एप्रिल)संध्याकाळी दिग्रसमध्ये सभा पार पडली. या सभेदरम्यान जनतेला संबोधित करताना आंबेडकरांनी थेट निवडणूक आयोगालाच जेलमध्ये टाकू असं विधान केलं. या विधानाची निवडणूक आयोगानं गंभीर दखल घेत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

वाचा अन्य बातम्या

VIDEO : सुप्रिया सुळे म्हणतात, 'मोदी आता परत आपल्याकडे येतील, त्यांना सांगायचं की...'

VIDEO : रक्ताने लिहून प्रेमपत्रं पाठवली, 'आर्ची'ने सांगितला थरारक किस्सा

VIDEO : राहुल गांधींच्या समोर भुजबळांनी केली मोदींची मिमिक्री

VIDEO: ...तर निवडणूक आयोगाला जेलमध्ये पाठवू - प्रकाश आंबेडकर

First published: April 4, 2019, 10:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading