मोर्चा काढल्याप्रकरणी मनसेच्या आयोजकांवर गुन्हा दाखल

मोर्चा काढल्याप्रकरणी मनसेच्या आयोजकांवर गुन्हा दाखल

मुंबईत राज ठाकरे यांच्या नेतृत्वात विना परवाना मोर्चा काढल्याबद्दल मनसेच्या मोर्चा आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. आझादनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय

  • Share this:

मुंबई, 5 ऑक्टोबर : मुंबईत राज ठाकरे यांच्या नेतृत्वात विना परवाना मोर्चा काढल्याबद्दल मनसेच्या मोर्चा आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. आझादनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. स्थानिक कायदा क्र. 20/17 कलम 37 (1) (इ) सह 135 महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे, सावर्जनिक वाहतुकीस अडथडा निर्माण करणे, प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करणे, हे प्रमुख आरोप मोर्चेकऱ्यांवर ठेवण्यात आलेत. परळ चेंगराचेंगरीच्या घटनेच्या निषेधार्थ मनसेनं आज मेट्रो सिनेमा चौक ते चर्चगेट स्टेशन या मार्गावरून हा मोर्चा काढला होता.

मनसेनं खरंतर या मोर्चासाठी पोलिसांकडे लेखी परवानगी मागितली होती. पण पोलिसांनी लेखी हमी मागितल्याने मनसेनं त्याला नकार दिला. त्यामुळे पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली. पण तरीही मनसेनं राज ठाकरेंच्या नेतृत्वात पूर्ण ताकदीने मैदानात मोर्चा काढत मोठं शक्तीप्रदर्शन केलं. अर्थात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेऊन मोर्चा काढतेवेळी पोलिसांनी कोणताही अटकाव केला नाही. पण मोर्चा संपताच पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचे सोपस्कार मात्र, पार पाडलेत. त्यामुळे गुन्हा दाखल झाला असला तरी मोर्चा काढल्याप्रकरणी खरंच राज ठाकरेंवर सरकार कारवाई करणार का हाच खरा प्रश्न आहे.

First published: October 5, 2017, 9:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading