DID फेम कोरिओग्राफर सलमान अडचणीत, महिलेची पोलिसात तक्रार

DID फेम कोरिओग्राफर सलमान अडचणीत, महिलेची पोलिसात तक्रार

...तेव्हा फिल्म इंडस्ट्रीत या गोष्टी होत असतात असे सलमान बोलल्याचं महिलेलं तक्रारीत म्हटलं आहे.

  • Share this:

मुंबई, 2 फेब्रुवारी : डान्स इंडिया डान्स या रिअॅलिटी शोमुळे प्रसिद्ध झालेला कोरिओग्राफर सलमान युसूफ खान याच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. कोरिओग्राफर महिलेने मुंबईतील ओशिवारा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

सलमान खानने दुबईत डान्स शो करायचे आहेत असे सांगून मुंबईत भेटला तेव्हा त्याने पहिल्यांदा गैरवर्तन केलं. त्यावेळी फिल्म इंडस्ट्रीत ह्या गोष्टी होत असतात असे सलमान म्हणाल्याचे महिलेनं तक्रारीत म्हटल आहे. त्यानंतर त्याने दुबईतील डान्स शोचे काम दिल्यानंतर सलमानने त्याच्या भावासह बेहरीन इथं गैरवर्तन केल्याचा आरोप महिलेने केला आहे.

दुबईतील बॉलीवूड पार्कमध्ये डान्स शोसाठी 40 डान्सरनी माझ्यावर विश्वास ठेवून करार केला. त्यांचे पासपोर्टही सलमानने काढून घेतले असून ते डान्सर आजही दुबईत अडकल्याचे महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. जेव्हा सलमानने दुबईत असताना जवळीक साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा प्रतिकार केल्यावर त्याने काम सोडून देण्यासाठी धमकीही दिली होती असा आरोप संबंधित महिलेने केला आहे.

सध्या दुबईत अडकलेल्या डान्सर्ससोबतही सलमान गैरवर्तन करत असल्याची भीती वाटते असेही महिलेनं आपल्या फिर्यादीत म्हटलं आहे. ओशिवारा पोलिस ठाण्यात याबाबत महिलेनं तक्रार दाखल करण्यात आली आहे. यात सलमानने छेडछाड करून विनयभंग केल्याचा अरोप केला आहे. या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलीस करत आहेत.

First published: February 2, 2019, 9:12 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading