शिल्पा आणि राज कुंद्राविरोधात 24 लाखांचा अपहाराचा गुन्हा दाखल

कंपनीच्या मालकाने शिल्पा आणि राजच्या विरोधात कोनगाव पोलीस स्थानकात तक्रार दाखल केलीये

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Apr 27, 2017 09:00 PM IST

शिल्पा आणि राज कुंद्राविरोधात 24 लाखांचा अपहाराचा गुन्हा दाखल

27 एप्रिल : अभिनेत्री शिल्पा शेट्टीविरोधात 24 लाख 12 हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्यासह पाच जणांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. भिवंडी तालुक्यातील सरवली एमआयडीसीमध्ये अलेशिया एक्स्पोर्ट कंपनी आहे. या कंपनीतून ऑनलाईन शॉपिंगद्वारे मागवण्यात आलेल्या बेडशिट्स ऑनलाईन कंपन्यांना पुरवण्यात येतात.

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा हे बेस्ट डिल टीव्ही या ऑनलाईन शॉपिंग कंपनीचे संचालक आहेत. त्यांनी वेगवेगळ्या कॉल सेंटर्सच्या माध्यमातून ऑर्डर केलेल्या बेडशीट्स पुरवूनही या कंपनीला तिचे पैसे मिळाले नाहीत.

त्यामुळे कंपनीच्या मालकाने शिल्पा आणि राजच्या विरोधात कोनगाव पोलीस स्थानकात तक्रार दाखल केलीये. हा प्रकार जुलै 2015 ते  मार्च 2016 आणि जुलै 2016 ते ऑगस्ट 2016 या कालावधीत घडल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 27, 2017 09:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...