पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या पत्नीने मुलीला पोलिओ ड्रॉप पाजायला दिला नकार, FIR दाखल

पाकिस्तानी अभिनेता फवाद खानविरुद्ध लाहोरमध्ये एफआयआर नोंदवण्यात आली आहे. पोलिओ टीमने फवादविरुद्ध पोलिसांत तक्रार नोंदवली.

News18 Lokmat | Updated On: Feb 21, 2019 12:26 PM IST

पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या पत्नीने मुलीला पोलिओ ड्रॉप पाजायला दिला नकार, FIR दाखल

पाकिस्तानी अभिनेता फवाद खानविरुद्ध लाहोरमध्ये एफआयआर नोंदवण्यात आली आहे. पोलिओ टीमने फवादविरुद्ध पोलिसांत तक्रार नोंदवली आहे.

पोलिओ टीमच्या मते, फैसल टाउन रेसिडेंसी येथे अभिनेत्याच्या घरी त्याच्या मुलीला पोलिओचा ड्रॉप देण्यासाठी पोलिओची टीम गेली होती. पण त्याच्या पत्नीने मुलीला पोलिओचा ड्रॉप देण्याचा विरोध तर केलाच शिवाय ती पोलिओच्या टीमसोबत फार उद्धटपणे वागली.

पोलिसांकडे नोंदवलेल्या तक्रारीनुसार, फवादच्या पत्नीने मुलीला पोलिओचा ड्रॉप देण्याचा विरोध केला. तसंच घरी आलेल्या टीमचाही अपमान केला. एवढंच नाही तर फवादच्या ड्रायव्हरनेही त्यांचा अपमान केला.

Loading...

यावर जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं की, फवाद खानच्या पत्नीने मुलीला पोलिओ ड्रॉप न पाजण्याचं काही ठोस कारण सांगितलं नाही.

तिच्या निष्काळजीपणामुळे हे सर्व प्रकरण वाढल्याचं ते म्हणाले. हे कमी की काय पोलिओ टीमसोबत गैरव्यवहार करणं कधीच मान्य केलं जाणार नाही.

पाकिस्तानी नियमांनूसार, अँटी पोलिओ ड्रॉपमध्ये निष्काळजीपणा दाखवल्यास दंड आणि दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात येऊ शकते.

जगभरात पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि नायझेरिया हे तीनच असे देश आहेत जे अजून पोलिओमुक्त नाहीत.

पोलिओमुळे लकवा येऊ शकतो तसेच मुलांचा मृत्यूही होतो. सध्या फवाद पाकिस्तान सुपर लीगसाठी दुबईत आहे. या घटनेवेळी तो घरी नव्हता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 21, 2019 12:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...