मोदी सरकारनं सर्वसामान्यांना दिला दिलासा, या जीवनाश्यक वस्तूंवरील GST केला कमी

मोदी सरकारनं सर्वसामान्यांना दिला दिलासा, या जीवनाश्यक वस्तूंवरील GST केला कमी

करदात्यांसाठी महत्त्वाच्या घोषणा, इतक्या लाखांपर्यत उत्पन्न असणाऱ्यांना GST माफ

  • Share this:

नवी दिल्ली, 24 ऑगस्ट : नरेंद्र मोदी सरकारने आज करदात्यांसाठी महत्त्वाच्या घोषणा केल्या. यात सर्वात मोठा निर्णय म्हणजे ज्या व्यापाऱ्यांचे वार्षिक उत्पन्न 40 लाख रुपये आहे त्यांना जीएसटी (GST) मधून सवलत देण्यात आली आहे. ही मर्यादा याआधी 20 लाख रुपये इतकी होती. या व्यतिरिक्त ज्या व्यवसायिकांचे वार्षिक उत्पन्न दीड कोटी रुपयांपर्यंत आहे ते कम्पोजिशन स्कीम निवडू शकतात. यापूर्वी केवळ 75 लाखांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न असलेल्या व्यापारींना ही योजना निवडण्याचा पर्याय निवडू शकले. वित्त मंत्रालयाने केलेल्या ट्विटमध्ये उत्पादकांच्या कंपोजीशन रेटमध्ये कपात करण्याचा उल्लेखही आहे.

जीएसटी लागू झाल्यापासून बहुतेक वस्तूंवरील कराचा दर कमी करण्यात आला आहे. मंत्रालयाने असे म्हटले आहे की 28 टक्के करांच्या खाली केवळ लक्झरी वस्तू व नाशवंत वस्तू आहेत. या टॅक्स स्लॅब अंतर्गत 230 वस्तू होत्या, मात्र 200 वस्तू कमी टॅक्स स्लॅबमध्ये हलविण्यात आल्या.

मंत्रालयाने आणखी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की बांधकाम क्षेत्र आणि विशेषत: निवासी क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला आहे. आता ते पाच टक्क्यांच्या टॅक्स स्लॅबखाली ठेवले आहे. स्वस्त घरांवरील जीएसटी दर आता एक टक्का झाला आहे.

जीएसटीच्या अंमलबजावणीच्या वेळी, करांची संख्या सुमारे 65 लाख होती, जी आता वाढून 1.24 कोटी झाली आहे. आता जीएसटीशी संबंधित संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे स्वयंचलित झाली आहे. आतापर्यंत 50 कोटी रिटर्न ऑनलाईन दाखल झाले असून 131 कोटी ई-बिले तयार करण्यात आली आहेत.

सिनेमा तिकिटावरील टॅक्स केला कमी

याशिवाय सरकारनं सिनेमा तिकिटावरील टॅक्सही कमी केली आहे. याआधी 35% ते 110% टॅक्स स्लॅबमध्ये असलेले तिकिटांचे दर आता 12% आणि 18% वर आले आहे. याशिवाय हेअर ऑइल, टूथपेस्ट, साबण यांच्यावरीलही जीएसटी कमी करण्यात आला आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: August 24, 2020, 12:59 PM IST
Tags:

ताज्या बातम्या