Home /News /news /

मोठी बातमी! मराठवाडा विद्यापीठानं पुढे ढकलल्या परीक्षा, यामुळे ओढवली नामुष्की!

मोठी बातमी! मराठवाडा विद्यापीठानं पुढे ढकलल्या परीक्षा, यामुळे ओढवली नामुष्की!

जालना, 29 सप्टेंबर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत मोठा निर्णय जाहीर केला आहे. तो म्हणजे विद्यापीठानं परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. येत्या 1 ऑक्टोबरपासून अंतिम वर्षाच्या परीक्षा सुरू होणार होती. मात्र, ऐन परीक्षेच्या तोंडावर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन सुरू केल्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याची नामुष्की विद्यापीठावर ओढवली आहे. हेही वाचा...देवेंद्र फडणवीसांच थेट बिहारहून उद्धव ठाकरेंना पत्र, उपस्थित केला 'हा' मुद्दा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने याबाबत एक परिपत्रक जाहीर केलं आहे. त्यानुसार, 1 ऑक्टोबर 2020 पासून अंतिम वर्षाच्या परीक्षा निश्चित करण्यात करण्यात आल्या होत्या. परंतु विद्यापीठातील सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ऐन परीक्षेच्या तोंडावर लेखणी बंद आंदोलन सुरू केल्यामुळे परीक्षा नियोजित तारखेला सुरू करणं, शक्य नाही. 1 ऑक्टोबरला सुरू होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेचं सुधारित वेळापत्रक स्वतंत्रपणे लवकरच प्रकाशित करण्यात येणार आहे, अलं परीक्षा व मूल्यमापन मंडळानं सांगितलं आहे. नागपूर विद्यापीठाकडून परीक्षेसाठी विशेष 'मोबाईल अ‍ॅप' दुसरीकडे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठानं ऑनलाईन परीक्षेसाठी विशेष मोबाईल अ‍ॅप तयार केले आहे. परीक्षेचा अंदाज यावा यासाठी अगोदर कुणीही मॉक टेस्ट देऊ शकत होते. मात्र आता केवळ विद्यार्थ्यांनाच ही मॉक टेस्ट देता येणार आहे. दरम्यान परीक्षेसाठी ऑनलाईन ओळखपत्रांचे वाटप सुरू झाले असून त्यातच युझर आयडी व पासवर्डचा समावेश राहणार आहे. परीक्षांसाठी मोबाईल अ‍ॅप तयार करणारे नागपूर विद्यापीठ हे राज्यातील पहिले विद्यापीठ ठरले. मात्र मॉक टेस्टवरुन विद्यापीठावर काही लोकांनी टीका करण्यास सुरुवात केली. मात्र ही परीक्षा नेमकी कशी असेल व उत्तरे कशा पद्धतीने द्यावी लागतील याचा अंदाज यावा यासाठीच ही मॉक टेस्ट आहे. वेळेच्या अभावामुळे विषयनिहाय मॉक टेस्ट घेणे शक्य नसल्याचे परीक्षा कुलगुरू डॉ सुभाष चौधरी यांनी स्पष्ट केले. हेही वाचा...'गांजा वापराला कायदेशीर परवानगी द्या'; लेखिका तस्लिमा नसरीन यांचा सल्ला दरम्यान, विद्यापीठातील सुमारे 75 हजार विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा देणार आहेत. एक तासाच्या वेळात विध्याथ्यांना दिलेल्या प्रश्नांची objective पद्धती ने उत्तर दयावे लागतील अश्यात कुणी कॉपी करायचा प्रयत्न केला तर ते करू शकणार नाही व त्यांची नोंद होताच त्याची चौकशी होऊ शकते, असा इशारा सुद्धा कुलगुरू डॉ सुभाष चौधरी यांनी विध्यार्थ्यांना दिला आहे.
Published by:Sandip Parolekar
First published:

पुढील बातम्या