• Home
 • »
 • News
 • »
 • news
 • »
 • विद्यार्थ्यांना दिलासा! अंतीम वर्षाच्या परीक्षा रद्द होणार, उच्चशिक्षण मंत्र्यांचा मोठा खुलासा

विद्यार्थ्यांना दिलासा! अंतीम वर्षाच्या परीक्षा रद्द होणार, उच्चशिक्षण मंत्र्यांचा मोठा खुलासा

उच्चशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देणारी बातमी आहे.

 • Share this:
  शिर्डी, 30 मे: उच्चशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देणारी बातमी आहे. विद्यापीठाच्या अंतीम वर्षाच्या परीक्षा रद्द होणार आहे. वर्षभरात मिळालेल्या गुणांवर विद्यार्थ्यांना ग्रेड दिला जाणार असल्याची माहिती उच्चशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली आहे. हेही वाचा.. विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत उद्धव ठाकरेंचे महत्त्वाचे निर्दश उच्चशिक्षण घेत असलेल्या हजारो विद्यार्थी आणि पालकांची चिंता लवकरच दूर होणार आहे. अंतीम वर्षाच्या परीक्षा घ्यायच्या की नाही यासाठी शनिवारी मुख्यमंत्री, उच्चशिक्षणमंत्री आणी कुलगुरूंची व्हिडिओ कॉन्फरन्सींग द्वारे चर्चा झाली. जवळपास दोन तास या विषयावर चर्चा झाल्यानंतर काही गोष्टींवर सर्वांचे एकमत झाले आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जुलै महिन्यात परीक्षा न घेता अंतीम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार गुण देण्यावर एकमत झाले असल्याचं उच्चशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी माहिती दिली आहे. दिलेल्या ग्रेडवर जर कुणाचा आक्षेप तर तर परीक्षा देण्याची संधीही उपलब्ध करून दिली जाणार आहे. या बाबतचा अंतीम निर्णय लवकरच होईल, असे प्राजक्त तनपूरे यांनी सांगितलं आहे. दरम्यान, राज्य सरकारच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील चिंतेत असलेल्या पालक आणि विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांनी दिले महत्त्वाचे निर्देश एकाही विद्यार्थ्याला विषाणूचा प्रादुर्भाव होणार नाही. याची काळजी घेऊन विद्यापीठांच्या परीक्षा घेण्यात याव्यात. त्यासाठी नेमकी परीक्षा पद्धती आणि वेळापत्रक निश्चित करून विद्यार्थी आणि पालकांच्या मनातील चिंता संपवली पाहिजे. त्यादृष्टीने विविध पर्याय पडताळून पाहण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी दिले. अंतिम वर्षासाठी सर्व वर्षांच्या सत्रांच्या सरासरी इतके गूण किंवा श्रेणी प्रदान करण्याची तसेच श्रेणी सुधारासाठी ऐच्छिक परीक्षेचा पर्याय देण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून पाहण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली. कोरोना या विषाणूच्या संकटाला संधी मानून महाराष्ट्रातील प्राथमिक ते उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि त्यातील प्रादेशिक विषमता संपविण्यासाठी प्रयत्न करण्याचे, नव्या शिक्षण पद्धतीबाबत संशोधन करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. हेही वाचा...फाइव्ह स्टार हॉटेलमध्येही होणार कोरोना रुग्णांवर उपचार; 'या' राज्याने सुरू केली विद्यापीठांच्या परीक्षा तसेच शैक्षणिक वर्षांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील अकृषी विद्यापीठांचे कुलगुरूंसमवेत व्हिडीओ कॉन्फरन्सींग द्वारे बैठक संपन्न झाली. या बैठकीत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, मुख्य सचिव अजोय मेहता, विभागाचे सचिव सौरभ विजय, तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ आदी सहभागी झाले.
  First published: