मराठ्यांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा, हायकोर्टात होणार अंतिम सुनावणी

मराठ्यांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा, हायकोर्टात होणार अंतिम सुनावणी

मराठा ही वेगळी जात नसून ती कुणबी जातीतच मोडते, असं मागास प्रवर्ग आयोगाकडून सादर केलेल्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

  • Share this:

विवेक कुलकर्णी, प्रतिनिधी

मुंबई, 06 फेब्रुवारी : मराठा आरक्षणा संदर्भात उच्च न्यायालयात दाखल विविध याचिकांवर आजपासून अंतिम सुनावणी सुरू होणार आहे. राज्य सरकारकडून ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी उच्च न्यायालयात बाजू मांडणार आहेत.

मराठा आरक्षणाविषयी मागास प्रवर्ग आयोगाचा तयार केलेला अहवाल जसाच्या-तसा कोर्टात मांडण्याचे आदेश हायकोर्टानं दिले होते. त्यानंतर 29 जानेवारीला हा अहवाल कोर्टासमोर मांडण्यात आला.

त्यात मराठा ही वेगळी जात नसून ती कुणबी जातीतच मोडते, असं मागास प्रवर्ग आयोगाकडून सादर केलेल्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची मागणी रास्त असून त्यांना 16 टक्के स्वतंत्र आरक्षण देण्याची शिफारस राज्य सरकारनं त्यांच्या अहवालातून केली आहे.

दोन्ही सभागृहात मराठा समाजासाठी 16 टक्के आरक्षणाचं विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आलं होतं. त्यानंतर मराठा आरक्षणाच्या विरोधात आणि समर्थनात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. यावर आजपासून अंतिम सुनावणी सुरू होईल.

ज्येष्ठ विधिज्ञ मुकूल रोहतगी सरकारची बाजू मांडणार

मराठा आरक्षणप्रकरणी सरकारची बाजू मांडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुकूल रोहतगी यांना विनंती केली होती. मुख्यमंत्र्यांनी विनंती मान्य करून रोहतगी यांनी सरकारची बाजू मांडण्यास होकार दिला. त्यानुसार त्यांच्या नियुक्तीचे आदेश शासनाने काढले आहेत. मुकूल रोहतगी यांच्यासोबत ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. परमजीत सिंह पटवालिया आणि सर्वोच्च न्यायालयातील सरकारी वकील अॅड. कटणेश्वरकर यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.


VIDEO : काँग्रेसमध्ये दाखल होताच शिल्पा शिंदेची मनसेवर टीका, UNCUT पत्रकार परिषद


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 6, 2019 10:04 AM IST

ताज्या बातम्या