Elec-widget

पाणीपूरीवरून लग्नाच्या मंडपात हाणामारी, तरुणाचा जागीच मृत्यू

पाणीपूरीवरून लग्नाच्या मंडपात हाणामारी, तरुणाचा जागीच मृत्यू

पाणीपूरी खाण्यावरून वर आणि वधू पक्षामध्ये हाणामारी सुरू झाली आणि त्यातच एकाला जीव गमावण्याची वेळ आली आहे.

  • Share this:

झारखंड, 18 जून : लग्नात हाणामारी झाल्याचं आपण सगळ्यांनी ऐकलंच असेल पण लग्नात हाणामारी झाल्यामुळे तरुणाची जीव गेल्याची धक्कादायक बातमी घडली आहे. सगळ्यात गंभीर म्हणजे पाणीपूरी खाण्यावरून वर आणि वधू पक्षामध्ये हाणामारी सुरू झाली आणि त्यातच एकाला जीव गमावण्याची वेळ आली आहे. हा घटनेमुळे लग्नघरात शोककळा पसरली आहे.

झारखंडच्या धनबाद जिल्ह्यामध्ये हा प्रकार घडला आहे. एका तरुणाचं शेजारच्या गावातील तरुणीशी विवाह ठरवण्यात आला होता. लग्नामध्ये वर पक्षाकडून खाण्याची जोरदार तयारी करण्यात आली होती. वर जेव्हा वाजत-गाजत लग्नमंडपात आला. त्य़ानंतर वऱ्हाड्यांनी पाणीपूरी खाण्यासाठी गोंधळ घातला.

या गोंधळामध्ये वर आणि वधूकडील मंडळींमध्ये जोरदार हाणामारी सुरू झाली. यावेळी जोरात लाथा बुक्क्या लागल्यामुळे यात एका तरुणाचा मृत्यू झाला. तब्बल 50 जणांमध्ये हाणामारी झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस लग्नमंडपात दाखल झाले. त्यांनी जमावाला पांगवलं. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला. या संपूर्ण प्रकरणात पोलीस आता कसून तपास करत आहे.

तर लग्नाच्या मंडपात असा प्रकार घडल्यामुळे वर आणि वधू पक्षात शोककळा पसरली आहे. या प्रकरणाची अधिक माहिती घेण्यासाठी पोलीस प्रत्येकाची चौकशी करणार असल्य़ाची माहिती देण्यात आली आहे.

Loading...

VIDEO : नवी मुंबईत शाळेजवळ आढळली बाँब सदृश वस्तू

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: fight
First Published: Jun 18, 2019 02:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...