वहिणीचा काटा काढण्यासाठी फेसबुकवर रचला प्लान, नणंदेने केलेला कट वाचून धक्का बसेल

वहिणीचा काटा काढण्यासाठी फेसबुकवर रचला प्लान, नणंदेने केलेला कट वाचून धक्का बसेल

आरोपी नणंदेनं सोशल मीडियावरून घरात वहिणीसोबत झालेल्या भांडणाचा बदला घेतला.

  • Share this:

सूरत, 30 डिसेंबर : प्रत्येक घरात नणंद आणि भावजयेमध्ये काही गोष्टींवरून मतभेद आणि भांडणं असतंच. पण अशाच शुल्लक वादातून वहिणीचा बदला घेण्यासाठी तरुणीने जे काही केलं ते वाचून तुम्हाला धक्का बसेल. रोज वहिणीशी होणाऱ्या वादाच एकदाच बदला घेण्यासाठी आरोपी नणंदेनं थेट सोशल मीडियाचा वापर केला.

आरोपी नणंदेनं सोशल मीडियावरून घरात वहिणीसोबत झालेल्या भांडणाचा बदला घेतला. नणंदेने आधी तिच्या वहिणीच्या नावाने सोशल मीडिया फेसबुकवर बनावट आयडी तयार केला आणि त्यानंतर त्यामध्ये तिच्या वहिणीला बदनाम करण्यासाठी अनेक अश्लील फोटो अपलोड केले. आरोपी महिलेने वहिणीच्या सर्व ओळखीच्यांना बनावट अकाऊंटवरून रिक्वेस्ट पाठवली आणि तिची बदनामी करण्यास सुरुवात केली.

जेव्हा आरोपी तरुणीने चुकून वहिणीलाच फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली तेव्हा या सगळ्या प्रकरणाचा उलगडा झाला. पीडित वहिणीने या सगळ्या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांच्या सायबर क्राइम सेलमध्ये आरोपी महिलेविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सुरतच्या सायबर क्राइम स्टेशनने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे आणि याप्रकरणी तिचे अश्लिल फोटो काढणाऱ्या आरोपी नणंदेला अटक केली आहे. पोलिसांच्या तपासणीत असे दिसून आले आहे की, आरोपी नणंद घरातल्या भांडणाचा बदला घेण्यासाठी तिच्या वहिणीला बदनाम करत होती. त्यासाठी तिने हे सोशल मीडियावर बदनामी करण्याचं सुरू केलं होतं.

Explainer : पाकिस्तान युद्धानंतरचा इंदिरा गांधींचा प्लॅन मोदी सरकारने केला पूर्ण

VIDEO 11 जणांचे मृतदेह लटकलेले सापडले होते 'त्या' कथित 'पछाडलेल्या' घरात आता राहणार 'हे' कुटुंब

दिल्लीतल्या बुराडी इथली ती भयानक घटना तुमच्या लक्षात आहे का? दीड वर्षांपूर्वी 11 जणांच्या सामूहिक आत्महत्येनं राजधानीच नाही, तर देश हादरला होता. जुलै 2018 मध्ये 11 जणांचे छताला गळफास घेऊन लटकलेले मृतदेह याच ठिकाणी सापडले होते. त्यानंतर पोलीस तपास झाला, या घटनेवर पडदा पडला पण तरीही या घरात कुणीही राहायला तयार होत नव्हतं. हे घर पछाडलेलं असल्याच्या अफवा या भागात पसरलेल्या होत्या. या घरात राहणाऱ्यांनाही पछाडलेल्या घराचा त्रास होईल, असं बोललं जायचं. पण आता मात्र त्या घरात एक दवाखाना उघडला आहे.

डॉ.मोहन सिंग नावाच्या वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञाने हे घर घेतलं असून ते इथे डायग्नॉस्टिक सेंटर चालवतात. "माझा अंधश्रद्धेवर विश्वास नाहीत. असता तर मी इथे आलोच नसतो. माझ्या पेशंटना इथे चाचण्यांसाठी येण्यात काहीही प्रॉब्लेम नाही." हे घर मुख्य रस्त्यापासून जवळ असल्याने उलट ते व्यवसायाच्या दृष्टीने सोयीचं असल्याचं डॉ. मोहन सिंग यांचं म्हणणं आहे.

इतर बातम्या - याकूब मेमनच्या फाशीला विरोध करणारा आमदार ठाकरेंच्या मंत्रिमंडळात

उत्तर दिल्लीतल्या बुराडी इथल्या या घरात तळमजल्यावर नांदणाऱ्या संपूर्ण कुटुंबाने गळफास घेऊन एकाच वेळी आत्महत्या केली होती, असं पोलीस तपासात निष्पन्न झालं. कुठल्या तरी अमानवी शक्तीच्या शोधात त्या कुटुंबातले सदस्य होते, असं काही जणांनी पोलिसांना सांगितलं होतं. त्यामुळे या घटनेतलं गूढ वाढत गेलं. पोलिसांच्या मते, कुठलं तरी अघोरी कृत्य करण्याच्या नादात काहीतरी चूक झाली आणि त्यातून सगळं कुटुंब संपलं असावं. या घरातले 10 जण पहिल्या मजल्यावरच्या लोखंडी जाळीला फासावर लटकलेले दिसून आले होते आणि घरातल्या सर्वात वयस्क आजीबाईंचा मृतदेह त्याच मजल्यावरच्या एका दुसऱ्या खोलीत आढळला होता. या मृतांपैकी दोन लहान मुलंही होती. त्यांचे हात-पाय बांधलेले होते. सर्वांच्या तोंडावर पट्ट्या बांधलेल्या होत्या आणि डोळे कपड्याने झाकलेले होते.

इतर बातम्या - मंत्रिमंडळ विस्तारानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, शपथविधीवर म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 30, 2019 08:19 PM IST

ताज्या बातम्या