कल्याण डोंबिवलीत कोरोनाविरोधात लढ्याला बळ, स्पेशल डॉक्टर आले मदतीला धावून!

कल्याण डोंबिवलीत कोरोनाविरोधात लढ्याला बळ, स्पेशल डॉक्टर आले मदतीला धावून!

आरोग्य सेवा केंद्रे आणि बाहेरील कोविड रुग्णालयात अधिक रुग्णवाहिका आणि परिवहन व्यवस्था तैनात केली आहे.

  • Share this:

डोंबिवली, 13 एप्रिल : कल्याण,डोंबिवलीत कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. आतापर्यंत केडीएमसी पालिकेच्या हद्दीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 50 हुन अधिक झाली आहे. तर दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाविरोधात लढ्यात आता इंडियन मेडिकल असोसिएशन अर्थात आयएमएचे पाठबळ मिळाले आहे.

आयएमएच्या डोंबिवलीचे डॉक्टर शास्त्रीनगर रूग्णालयात आणि सद्या केडीएमसीने डोंबिवलीच्या हेल्थ केंद्रांवर गेल्या आठवड्यापासून सुरू केलेल्या कम्युनिटी क्लिनिकमध्ये (ताप ओपीडी) ऑनररी ओपीडी सेवा देत आहेत. डोंबिवलीत वाढती रुग्ण संख्या आढळून आल्याने केडीएमसीने यापूर्वीच शास्त्रीनगर रूग्णालयात डेडिकेटेड कोरोना हेल्थ सेंटर सुरू केले आहे. त्यासाठी डोंबिवलीत आणखी एका केंद्रात कोरोना हॉस्पिटल स्थापित करण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहे. आयएमएने केडीएमसीला डोंबिवलीत लवकरात लवकर कोव्हिड हॉस्पिटल सुरू करण्यासाठी मदत करण्यासाठी सर्व स्तरांवर सतत काम करत आहे.

हेही वाचा - वेदनेनं किंचाळत असलेल्या गर्भवती महिलेकडे दुर्लक्ष, उभ्याने दिला बाळाला जन्म

आयएमएच्या सूचनेनुसार, आरोग्य सेवा केंद्रे आणि बाहेरील कोविड रुग्णालयात अधिक रुग्णवाहिका आणि परिवहन व्यवस्था तैनात केली आहे. शास्त्रीनगर रूग्णालयात स्थानिक कोव्हिड डायग्नोस्टिक सुविधा उपलब्ध आहेत. शास्त्रीनगर रुग्णालयात कोव्हिड चाचणीसाठी नमुना संकलन सुरू करण्यात आले आहे. तसंच डोंबिवलीमधील आर.आर.हॉस्पिटल सुद्धा महापालिकच्या ताब्यात देण्यात आले असून तिथे सुद्धा आयएमएचे डॉक्टरस सेवा देणार आहे.

स्पेशल कोविड टास्कफोर्स

आयएमएच्या कोव्हिड वॉरियर्स टास्क फोर्समध्ये समावेश असलेले राष्ट्रीय आणि राज्य कोव्हिड कार्य बलाचे डॉ. मंगेश पाटे, डॉ. वंदना धाकतोडे, डॉ. हेमंत पाटील, डॉ. विजय चिंचोले, डोंबिवली टास्क फोर्सच्या डॉ. अर्चना पाटे, डॉ. मीना पृथी, डॉ. नीती उपासनी, डॉ. भक्ती लोटे, डॉ. विजयलक्ष्मी शिंदे, आदी डॉक्टर मंडळी नैतिक आणि सामाजिक जबाबदारी समजून डोंबिवलीत लोकहितार्थ कार्य करत आहेत. त्याचप्रमाणे केडीएमसीच्या डॉ.प्रतिभा पानपाटील आणि टीम सुद्धा अहोरात्र काम करत वैद्यकीय सेवा पुरवत आहेत.

हेही वाचा -वाह! 7 वर्षाच्या चिमुकलीनं कोरोनाशी युद्ध जिंकलं, 7 दिवसांत रिपोर्ट निगेटव्ह

मनसे आमदार आणि सेनेच्या खासदाराकडून मदत

तर यात कल्याण-डोंबिवलीमधील लोकप्रतिनिधीही पाठीमागे नाहीत. खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या मार्फत शीळफाटा पडले गाव इथे कोविड19 साठी खासगी हॉस्पिटल उपलब्ध करून दिले आहे. तसंच पत्रकारांशी मोफत तपासणी सुद्धा केली जात आहे. मनसे आमदार राजू पाटील यांनी स्वतःचे डोंबिवली मधील आर.आर.हॉस्पिटल कोविड19 साठी केडीएमसीला दिले आहे. कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून रुक्मिणीबाई रुग्णालयात 100 पी.पी.ई किटचे वाटप केले आहे. तर नगरसेवक कुणाल पाटील,दीपेश म्हात्रे, राजेश मोरे यांच्याकडून सुद्धा पोलीस, पत्रकार तसंच नागरिकांना वैद्यकीय मदत केली जात आहे. एमसीएचआय संघटना सुद्धा मदत करत असल्याचे रवी पाटील यांनी सांगितलं.

First published: April 13, 2020, 4:02 PM IST

ताज्या बातम्या