पाचवी आणि आठवीची पुन्हा सुरू होणार परीक्षा, जावडेकरांचे संकेत

पाचवी आणि आठवीची पुन्हा सुरू होणार परीक्षा, जावडेकरांचे संकेत

पाचवीत विद्यार्थी गेला तरी त्याला लिहिता वाचता येत नाही हे चित्र बदलणार आहे असा दावा जावडेकर यांनी केलाय.

  • Share this:

08 जानेवारी :  पहिली ते आठवी पर्यंत परीक्षा नाहीत हा निर्णय लवकरच रद्द होऊन अनेक राज्यात पाचवी आणि आठवीच्या परीक्षा पुन्हा सुरू होतील असे स्पष्ट संकेत केंद्रीय शिक्षण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिले आहे.

आरटीई अर्थात शिक्षण हक्क कायद्याची परिमाणं बदलताना आता पायाभूत सुविधा,वर्ग,शिक्षक किती कसे या ऐवजी शिक्षणाचा दर्जा काय यावर भर देणार असून पाचवीत विद्यार्थी गेला तरी त्याला लिहिता वाचता येत नाही हे चित्र बदलणार आहे असा दावा जावडेकर यांनी केलाय. ते पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूट मध्ये पदवी प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते.

यूजीसी,AICCTE, NCT या संस्थांमध्ये सुसूत्रता, एकजिनसीपणा आणण्यासाठी त्यांच्या कार्यपद्धतीत बदल केला जाणार असल्याचे संकेत देताना जावडेकर यांनी गुणवत्तेवर आधारित स्वायत्तता या धोरणानुसार लवकरच आयआयएम सारख्याचं सरकारचं नियंत्रण संपुष्टात येणार असल्याचं सांगितलंय.

First published: January 8, 2018, 4:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading