S M L

याला म्हणतात फुटबॉल!चाहत्यांच्या नुसत्या जल्लोषानं मेक्सिकोत ‘भूकंप’

चाहत्यांचा जल्लोष एवढा मोठा होता की राजधानी मेक्सिको सिटी हादरून गेली...भूकंपमापन केंद्रावर त्याची नोंदही झाली यावरून चाहत्यांच्या जल्लोषाची कल्पना येवू शकते.

Ajay Kautikwar | Updated On: Jun 18, 2018 06:23 PM IST

याला म्हणतात फुटबॉल!चाहत्यांच्या नुसत्या जल्लोषानं मेक्सिकोत ‘भूकंप’

मेक्सिको सिटी,ता.18 जून : फीफा वर्ल्ड कप सामन्यात रविवारी झालेली जर्मनी आणि मेक्सिकोच्या पहिल्याच सामन्यात मेक्सिकोनं 1-0 अशी मात दिल्यानंतर चाहत्यांचा जल्लोष एवढा मोठा होता की राजधानी मेक्सिको सिटी हादरून गेली...भूकंपमापन केंद्रावर त्याची नोंदही झाली यावरून चाहत्यांच्या जल्लोषाची कल्पना येवू शकते.

मेक्सिको आणि जर्मनीची मॅच रोमहर्षक ठरली. जर्मनीच्या बलाढ्य संघाला मेक्सिकोनं जोरदार लढत दिली. बचावासाठी जगविख्यात असलेल्या जर्मनीची संरक्षक फळी भेदत मेक्सिकोनं पहिला गोल मारला आणि शेवटपर्यंत जर्मनीवर दबाव कायम ठेवला.मेक्सिकोच्या चाहत्यांच्या आनंदाला उधाण आलं...सर्व मेक्सिकोत जल्लोष झाला. या जल्लोषाचं केंद्र बिंदू होती मेक्सिकोची राजधानी मेक्सिको सिटी. या शहराचे सर्व रस्ते फुटबॉलप्रेमींनी ओसंडून वाहत होते. नाचणं, गाणे, उड्या मारणे आणि आनंदानं बेभान झालेल्या चाहत्यांचा जोष एवढा जबरदस्त होता की जमीनही हादरून गेली....तिथल्या वेधशाळेने सकाळी 11.32 मीनिटांनी हादरे बसल्याची त्यांची नोंदही केली.

मेक्सिकोतल्या फुटबॉलप्रेमींचा हा जल्लोषाचा व्हिडीओ जगभर व्हायरल झालाय...नेटकऱ्यांचीही त्याला जोरदार पसंती मिळत आहे. मेक्सिकोतला हा भूकंप नैसर्गिक होता....पण त्याचं केंद्र बिंदू होतं फुटबॉलचे चाहते.

 

Loading...
Loading...

 

 

 

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 18, 2018 06:23 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close