मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

महिला शिक्षिकाच फुल्ल टाईट, झिंगत झिंगत पोहोचली वर्गात; शिक्षण विभागात खळबळ

महिला शिक्षिकाच फुल्ल टाईट, झिंगत झिंगत पोहोचली वर्गात; शिक्षण विभागात खळबळ

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

शाळेत एकूण 54 विद्यार्थी शिकतात. महिला शिक्षिका जगपती भगत सर्व विषय शिकवते.

  • Published by:  News18 Desk
जशपूर, 24 जुलै : अनेक शिक्षक मद्यधुंद अवस्थेत शाळेत गोंधळ घालत असल्याच्या बातम्या येतात. मात्र, तुम्ही एका महिला शिक्षिकेला मद्यधुंद अवस्थेत शाळेत झोपलेले पाहिले आहे का? तर असाच एक धक्कादायक प्रकार जशपूर येथील सरकारी शाळेतून समोर आला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण -  ही घटना सरकारी प्राथमिक शाळा टिकैतगंज येथील आहे. याठिकाणी बीईओ एमझेडयू सिद्दीकी गुरुवारी सकाळी 11 वाजता पाहणीसाठी आले होते. वर्गात मुले बसलेली होती. याचवेळी सहाय्यक शिक्षिका जगपती भगत या खुर्चीत बेशुद्धावस्थेत पडल्याचे त्यांना आढळले. शिक्षिकेला नशेत पाहून बीईओने अतिरिक्त एसपींना फोन करून महिला पोलिसांना बोलावले. छत्तीसगडमधील महिला शिक्षिकेने शाळेत दारू पिण्याची ही पहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे. शाळेत एकूण 54 विद्यार्थी शिकतात. महिला शिक्षिका जगपती भगत सर्व विषय शिकवते. मद्याधुंद अवस्थेत आढळल्यानंतर जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी महिला शिक्षिकेला निलंबित केले आहे. बीईओ एमझेडयू सिद्दीकी म्हणाले, “मी शाळेत नियमित तपासणीसाठी गेलो होतो. शिक्षिक खुर्चीवर बेशुद्ध पडलेली मला दिसले. सुरुवातीला मला वाटले की, ती आजारी आहे. मी मुलांकडून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. मुलांचे उत्तर ऐकून मला आश्चर्य वाटले. दारू प्यायल्याने शिक्षक बेशुद्ध झाल्याचे त्यांनी सांगितले. बीईओ एमझेडयू सिद्दीकी यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी पालकांनी हीच महिला शिक्षिका भगत दारू पिऊन शाळेत येत असल्याची तक्रार केली होती. शालेय समितीने महिला शिक्षिकेला दारू पिणे बंद करावे, असा इशाराही दिला होता. मात्र, त्याचा काहीही परिणाम झाला नाही. शाळेच्या मुख्याध्यापिका आरती भगत यांनीही या शिक्षिकेला अनेकदा ताकीद दिली होती. दारू पिऊन या अवस्थेत आढळली महिली शिक्षिका
दारू पिऊन या अवस्थेत आढळली महिली शिक्षिका
हेही वाचा - 5 वर्षाच्या पुतणीने मागितला आंबा; भडकलेल्या काकाने जे केलं ते वाचूनच उडेल थरकाप बीईओ यांनी जशपूरच्या अतिरिक्त एसपी प्रतिभा पांडे यांना बोलावून संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. तसेच शिक्षिकेची वैद्यकीय तपासणी करता येईल यासाठी महिला पोलीस कर्मचाऱ्याला पाठवण्याची विनंती केली. यानंतर त्यांनी तातडीने दोन महिला पोलिसांना शाळेत पाठवले. महिला शिक्षिकेला पोलिस व्हॅनमधून जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. महिला शिक्षिकेने मद्यप्राशन केल्याची डॉक्टरांनी म्हटले आहे. जिल्हा शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जशपूर जिल्ह्यात या सत्रात मद्यप्राशन करून शाळेत आल्याबद्दल आतापर्यंत 5 शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे.
First published:

Tags: Chhattisgarh, Crime news, School teacher

पुढील बातम्या