महिला शिक्षिकेने मुंडन करून राहुल गांधींना पाठवले केस, वाचा काय आहे कारण?

महिला शिक्षिकेने मुंडन करून राहुल गांधींना पाठवले केस, वाचा काय आहे कारण?

निवडणुकीनंतर काँग्रेसने वचन दिलं होतं की सरकार स्थापन झाल्यानंतर आमच्या सर्व मागण्या मान्य केल्या जातील.

  • Share this:

भोपाळ, 20 फेब्रुवारी : भोपाळमध्ये गेल्या 72 दिवसांपासून आपल्या मागण्यांसाठी धरणे आंदोलनकर्त्यांसाठी बुधवारचा दिवस अतिशय भावूक करणारा ठरला. बुधवारी दुपारी आंदोलनासाठी बसलेल्या एका महिला अतिथींनी आपल्या केसांचा त्याग करत स्वत: हून सार्वजनिक मुंडन केलं. डॉ शाहीन खान असं मुंडन केलेल्या महिलेचे नाव आहे.

मुंडने केल्यानंतर एका वृत्तवाहिणीशी बोलताना शाहीन खान अतिशय भावूक झाल्या आणि म्हणाल्या की निवडणुकीनंतर काँग्रेसने वचन दिलं होतं की सरकार स्थापन झाल्यानंतर आमच्या सर्व मागण्या मान्य केल्या जातील. यानंतर आता गेले एक वर्ष आम्ही वाट पाहिली आणि आंदोलन सुरू केलं, नोटीस काढण्यात आली. आम्ही इथे दोन महिन्यांपासून निवेदन करत आहोत, पण सरकारने आमची दखल घेतली नाही. आम्ही मुलांचे शिक्षण देऊन त्यांचे भविष्य घडविले, परंतु आता आपले स्वतःचे भविष्य अंधारात आहे, आम्हाला लेखी ऑर्डर मिळाल्याशिवाय आम्ही मागे होणार नाही.

इतर बातम्या - दिवसातून 10 वेळा अंघोळ करायची पत्नी, नोटासुद्धा धुवायची; पतीने हत्या करून संपवलं

त्याचबरोबर संघर्ष मोर्चाचे अध्यक्ष देवराज सिंह म्हणाले की, अतिथी विद्वानांसाठी हा दु: खद दिवस नाही, कारण एका महिलेने आपले केस कापले आणि मुंडन केलं. आम्ही डॉ. शाहीन यांनी मुंडलेले केस राहुल गांधींकडे पाठवू जेणेकरुन त्यांना समजेल की त्यांचे वचन पाळले जात नाही.

महिलेच्या मुंडनाच्या घटनेनंतर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यावर निशाणा साधला. शिवराजसिंह चौहान यांनी फेब्रुवारी 2018 मध्ये कमलनाथ यांचे जुने ट्विट शेअर करताना लिहिले की, 'मुख्यमंत्री, आजही केस हे स्त्रीच्या सन्मानाचे प्रतीक आहेत. तुमच्या झोपलेल्या सरकारला जागृत करण्यासाठी अतिथी विद्वान बहिणींनी आपले केस त्यागले, आज त्यांच्या दु: खाची कल्पना आहे का? आज राज्याला लाज वाटली का? त्यांच्या भल्यासाठी तुम्ही काही पाऊलं उचलाल का?'

इतर बातम्या - निर्भया प्रकरण: आरोपी विनयने भिंतीवर डोकं आपटून स्वत:ला केलं जखमी

खरंतर, शिवराजसिंह चौहान मुख्यमंत्री असताना कमलनाथ यांनी महिला मुंडनाच्या एका घटनेवरून शिवराजसिंह यांना लक्ष केलं होतं. आणि घटनेला हृदय दु: खद घटना म्हटलं होतं. मध्य प्रदेशातील अतिथी विद्वान त्यांच्या नियमितीकरणाच्या मागणीसाठी 2 डिसेंबर 2019 पासून आंदोलन करत आहेत, जे आतापर्यंत सुरू आहे.

इतर बातम्या - कमल हसन यांच्या सिनेमाच्या शूटिंगवेळी अपघात, असिस्टंट डायरेक्टसह 3 जणांचा मृत्यू

First published: February 20, 2020, 9:59 AM IST

ताज्या बातम्या