मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

तुम्हाला खूप झोप येते का? तुमचं शरीर देतंय गंभीर आजाराचं संकेत

तुम्हाला खूप झोप येते का? तुमचं शरीर देतंय गंभीर आजाराचं संकेत

नेहमीप्रमाणे तुमचा दिनक्रम घरातच सुरू ठेवा. क्षमतेपेक्षा जास्त काम करू नका. विशेष म्हणजे पुरेशी झोप घ्या.

नेहमीप्रमाणे तुमचा दिनक्रम घरातच सुरू ठेवा. क्षमतेपेक्षा जास्त काम करू नका. विशेष म्हणजे पुरेशी झोप घ्या.

कमी झोपेप्रमाणे (sleep) अति झोपही एक समस्या आहे, मात्र त्याकडे दुर्लक्ष केलं जातं.

  • myupchar
  • Last Updated :

व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी झोप आवश्यक आहे. अनेकांची तक्रार असते की त्यांना झोप चांगली लागत नाही, 7 तासही झोपू शकत नाही. प्रौढांना 7 ते 9 तासची झोप आवश्यक आहे. मात्र यापेक्षा कमी झोपत असाल तर तो चिंतेचा विषय आहे. पण जर या पेक्षाही जास्त झोपत असाल तर तेदेखील काळजीचं कारण आहे. जसं पुरेशी झोप न मिळणे आरोग्यासाठी धोकादायक तसंच अधिक झोप घेणं म्हणजे आजारांना आमंत्रण आहे. अति झोप हे आरोग्याशी संबंधी समस्येचे संकेत असू शकतं. साधारणपणे अतिनिद्रेकडे लोक दुर्लक्ष करतात. पण अतिनिद्रेच्या कारणांचा शोध घेणं आवश्यक आहे. काहीवेळा 10-12 तास झोपल्यावरही लोकांना थकवा जाणवत राहतो. याचे मुख्य कारण हाइपरसोमनिया असू शकते.

myupchar.com चे एम्सशी संबंधित डॉ. नबी वली यांचे म्हणणे आहे की हाइपरसोमनिया म्हणजे अशी स्थिती आहे की ज्यात व्यक्तीला इतकी झोप येते की दिवसाही तो झोपतो. अशी व्यक्ती दिवसातील 24 तासांमधील 9 तासांपेक्षा अधिक वेळ झोपलेले असतात. जर हाइपरसोमनिया किंवा झोपेशी निगडीत इतर समस्या नसेल तर अशा व्यक्तीला आरोग्याची काही समस्या असण्याचे संकेत आहेत.

औदासिन्य

औदासिन्य असलेल्या लोकांना कमी झोप येते, तर काही जणांना अतिझोप येते. तुम्हाला औदासिन्य आहे की नाही हे माहित नसेल तर तात्काळ डॉक्टरांना भेटून उपचार करायला हवा.

हृदय विकार

दिवसा झोप येणे आणि अति झोपणे हे हृदय विकाराचे लक्षण असू शकते. जवळपास 70 हजार महिलांवर करण्यात आलेल्या अभ्यासात असे दिसून आले की ज्या महिला रोज रात्री 9 ते 11 तास झोपत होत्या त्यांना 8 तास झोपणाऱ्या महिलांपेक्षा हृदय रोग होण्याची शक्यता 38 टक्के अधिक आढळून आली.

थायरॉइडची तपासणी करा

हाइपोथायरॉइडिझमचा संबंध दिवसात 10 तासांपेक्षा अधिक झोपण्याशी आहे. त्यामुळे थकवाही जाणवतो आणि झोपही येते. हाइपोथायरॉइडिझमच्या रुग्णांना 7 ते 9 तासाच्या झोपेनंतरही थकवा जाणवतो. म्हणून अधिक झोप येत असेल तर थायरॉइडची तपासणी करून घ्या. myupchar.com चे एम्सशी संबंधित डॉ. अनुराग शाही यांचे म्हणणे आहे की जेव्हा थायराइड ग्रंथी योग्य प्रमाणात थायरॉइड हार्मोन बनवू शकत नाहीत, तेव्हा ही समस्या उद्भवते.

विशिष्ट हंगामात झोपणे

विशिष्ट हंगामात अति झोपणे सामान्य आहे. याला अफेक्टिव डिसऑर्डर म्हणजेच एसएडी म्हणून ओळखले जाते. एसएडी विशेषत: हिवाळ्याच्या सुरुवातीला होते. तेव्हा खूप दिवसांपासून अधिक झोप येत असेल तर ते एखाद्या आजाराचे लक्षण असू शकते तेव्हा दुर्लक्ष करू नका डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख - सुस्ती

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

First published:

Tags: Sleep