बंगळूरू,ता.15 जून : बंगळूरूची ओळख देशात आयटीचं शहर अशी आहे. त्याचबरोबर देशाची ही आय.टी. राजधानी ओळखली जाते ती ट्राफिक जामसाठी. अपुरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि वाढणारी वाहनांची संख्या यामुळं नागरिकांना दररोज प्रचंड वाहतूक कोडींला सामोरे जावे लागते.
दररोजच्या या कटकटीला कंटाळून एक सॉफ्टवेअर इंजिनिअरनं आज चक्क घोड्यावर बसून ऑफिसमध्ये गेला आणि बंगळूरूच्या वाहतूक समस्येकडे जगाचं लक्ष वेधलं.
रूपेश कुमार वर्मा हा सॉफ्टवेअर इंजिनिअर गेल्या 8 वर्षांपासून बंगळूरात राहतो.
भय्यूजी महाराज आत्महत्येप्रकरणी कुटुंबीयांची चौकशी
अॅम्बेसी गोल्फ लिंक कॅम्पस, रिंग रोड या प्राईम लोकेशनला त्याचं ऑफिस आहे. रूपेशला घरून त्याच्या ऑफिसमध्ये पोहोचायला दररोज दोन तासांपेक्षा जास्त वेळ लागत होता. या कंटाळवाण्या प्रवासाला वैतागून त्यानं नोकरीच्या शेवटच्या दिवशी घोड्यावरून प्रवासाचा निर्णय घेतला.
आणि बंगळूरूच्या वाहतूक कोंडीतून मार्ग काढत घोड्यावरून रपेट करत तो ऑफिसमध्ये पोहोचला. त्यावेळी बंगळूरूच्या ट्राफीकला वैतागल्याची पाटीही त्यानं घोड्याच्या गळ्यात घातली होती. रूपशच्या मित्रांनीही त्याचं जोरदार स्वागत केलं.
हे तर संघ आणि भाजपचं मनुवादी राजकारण- राहुल गांधी
पश्चिम रेल्वेवर हाय अलर्ट, लोकल मार्ग उडवून देण्याच्या धमकीनंतर कडक सुरक्षाव्यवस्था
रूपेश हा राजस्थानमधल्या पिलानीचा असून मनिपाल विद्यापीठातून त्यानं इंजिनिअरिंग पूर्ण केल. 8 वर्षांची नोकरी सोडून तो आता आपल्या गावी सॉफ्टवेअर कंपनी काढणार आहे. बंगळूरूच्या ट्राफिकच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी त्यानं जी क्लुप्ती केली त्याला सोशल मीडियावरूनही जोरदार प्रतिसाद मिळाला आहे.