मुंबईहून येणाऱ्या चाकरमान्यांमुळे कोकणाला भरली धडकी, 3 दिवसांत परतली 40 हजार माणसं

मुंबईहून येणाऱ्या चाकरमान्यांमुळे कोकणाला भरली धडकी, 3 दिवसांत परतली 40 हजार माणसं

त्यामुळे कशेडी घाट आणि खारेपाटण भागात वाहतुकीचा खोळंबा होतोय. शेकडो वाहनांच्या रांगा त्या ठिकाणी लागल्या आहेत. त्यामुळे प्रशासनावर प्रचंड ताण येत आहे.

  • Share this:

सिंधुदुर्ग 16 मे: लॉकडाउनच्या चौथा टप्पा सुरु होताना रोज हजारो मुंबईकर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होत आहेत. या सर्व मुंबईकरांची नोंदणी करण्यात येत असल्यामुळे  सिंधुदुर्गातल्या खारेपाटण आणि रत्नागिरीतल्या कशेडी चेक पोस्ट या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतायत. त्यामुळे कशेडी घाट आणि खारेपाटण भागात वाहतुकीचा खोळंबा होतोय. शेकडो वाहनांच्या रांगा त्या ठिकाणी लागल्या आहेत. त्यामुळे प्रशासनावर प्रचंड ताण येत आहे.

रोज हजारोंच्या संख्येने मुंबईकर कोकणात येत आहेत. ते येताना त्यांची चेकपोस्ट वर आरोग्य विभागाकडून चौकशी करण्यात येत आहे . यातल्या साठ वर्षापेक्षा जास्त असलेल्या व्यक्ती ,  लहान मुले आणि त्यांच्या मातांना हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के मारुन त्यांच्या गावातल्या घरी  पाठवण्यात येत आहे. गावात गेल्यावर त्यानी तिथल्या सरपंचाना भेटून तशी नोंद करुन आपल्या घरी 14 दिवस क्वारंटाईन राहावे असे आदेश सिंधुदुर्ग प्रशासनाने दिले आहेत .

या 14 दिवसात जर त्याना कोरोना सदृश कोणतीही  लक्षणे कधीही दिसली तर त्यांचे स्वॅब घेण्यात येउन अहवाल येईपर्यंत त्याना हॉस्पिटल आयसोलेशन मध्ये ठेवण्यात येणार आहे . मात्र मुंबईहून येतानाच जर कुणाला कोरोनासदृश लक्षणे आढळली तर त्याना होम क्वारंटाईन न करता थेट संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात येउन पाच दिवसानी त्यांचे स्वॅब घेण्यात येणार आहेत . ही सगळी व्यवस्था करावी लागत असल्यामुळे मुंबईकरांचे कोकणात येण्याचे प्रमाण पाहता आरोग्य यंत्रणेवर सध्या प्रचंड ताण येत आहे.

पहिल्याच दिवशी राज्यातल्या 8,268  ग्राहकांना घरपोच देण्यात आली दारु

गेल्या तीन दिवसात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात चाळीस हजाराहून अधिक मुंबईकर दाखल झाले आहेत . कोरोना रेड झोन मधून एव्हढ्या मोठ्या प्रमाणात मुंबईकर येत असल्यामुळे गावकऱ्यांची धास्ती वाढली आहे . त्य्यमुळे अनेक गावांनी काही दिवस आपल्या गावातील बाजारपेठा पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय.

रेस्टॉरंटने पंतप्रधानांना म्हटलं जागा नाही, टेबल रिकामं होईपर्यंत बघितली वाट

होम क्वारंटाईन करण्यात आलेले मुंबईकर 14 दिवस घराबाहेर पडू नयेत आणि पडले तर त्याबाबत प्रशासनाला तातडीने माहिती मिळावी म्हणून रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यानी दापोली आणि मंडणगड तालुक्यात तरुणांची ग्राम सुरक्षा दले निर्माण केली आहेत . अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग आहे . पण रत्नागिरी  सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळलेले  99 टक्के कोरोनाबाधीत हे मुंबईतूनच आलेले असल्यामुळे मुंबईतून येणाऱ्यांचे प्रमाण नियंत्रीत असावे अशी मागणी गावकरी करु लागले आहेत .

First published: May 16, 2020, 10:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading