• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • गावातील लोकांना शिकवायला गेला धडा, बापाने 3 महिन्याच्या मुलीला जमिनीवर आपटले, जालन्यातील घटना

गावातील लोकांना शिकवायला गेला धडा, बापाने 3 महिन्याच्या मुलीला जमिनीवर आपटले, जालन्यातील घटना

गावातील नागरिकांनी तातडीने स्नेहाला मंठा ग्रामीण रुग्णालयात हलविले. मात्र डोक्याला गंभीर स्वरूपाची इजा झाल्याने रस्त्यातच तिचा मृत्यू झाला होता.

  • Share this:
जालना, 08 ॲाक्टोबर : घरासमोर झालेल्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादानंतर गावातील लोकांना अद्दल घडवण्याच्या उद्देशाने एका विकृत बापाने (father killed his daughter) आपल्याच पोटच्या 3 महिन्याच्या मुलीला जमिनीवर आपटून ठार मारण्याची खळबळजनक घटना जालन्यात (Jalana) घडली आहे. या विकृत बापाला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंठा तालुक्यातील केहाळ वडगाव इथं ही घटना घडली आहे. अविनाश लिंबा चव्हाण असं या विकृत बापाचे नाव आहे. अविनाश चव्हानच्या घरासमोर गुरुवारी रात्री दोन महिला शौचास बसल्या होत्या. त्यावेळी अविनाश याने ‘आम्हाला वास येतो, येथे शौचास बसू नका’ असे बजावले होते. यावेळी अविनाश आणि महिलांमध्ये बाचाबाची झाली होती. त्यानंतर या महिला तिथून निघून गेल्या. त्यानंतर या महिला आपल्या घरातील लोकांना घेऊन अविनाश चव्हाणच्या घरी आले आणि त्याला उलट जाब विचारला. त्यावेळी अविनाश याने जाब विचारणाऱ्यांना अद्दल घडवून, त्यांना खुनाच्या गुन्ह्यात अडकविण्यासाठी स्वतःच्या 3 महिन्याच्या स्नेहा नावाच्या मुलीला निर्दयीपणे जोरात जमिनीवर आपटले. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली. गावातील नागरिकांनी तातडीने स्नेहाला मंठा ग्रामीण रुग्णालयात हलविले. मात्र डोक्याला गंभीर स्वरूपाची इजा झाल्याने रस्त्यातच तिचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी राजू मोरे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्यासह अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळाचा पंचनामा केला. आरोपी अविनाश चव्हाणला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे गावात संताप व्यक्त केला जात आहे.
Published by:sachin Salve
First published: