30 जूनच्या मध्यरात्री जन्मली मुलगी, नाव ठेवलं जीएसटी !

30 जूनच्या मध्यरात्री जन्मली मुलगी, नाव ठेवलं जीएसटी !

बाराच्या ठोक्याला तिला दोन जुळी मुलं झाली. यातला एक मुलगा होता तर दुसरी मुलगी. बरोबर याच वेळी जीएसटी देशभर लागू झाला.

  • Share this:

2 जुलै : 30 जूनच्या मध्यरात्री 12 वाजता देशभरात एकच करप्रणाली अर्थात जीएसटी लागू झाला. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये जीएसटी लाँचिंगचा ऐतिहासिक सोहळा पार पडला. त्याचवेळी राजस्थानमध्ये एका मुलीचा जन्म झाला आणि तिच्या आई-वडिलांनी आपल्या मुलीचं नाव लाडाने जीएसटी ठेवलं.

ही घटना आहे राजस्थानातल्या पाली शहरातली. पाली शहरात राहणाऱ्या जसराजच्या पत्नीला संध्याकाळी प्रसुती वेदना सुरू झाल्या. तेव्हा तिला बांगड हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं.

रात्री बरोबर बाराच्या ठोक्याला तिला दोन जुळी मुलं झाली. यातला एक मुलगा होता तर दुसरी मुलगी. बरोबर याच वेळी जीएसटी देशभर लागू झाला. याच आनंदाच्या भरात जसराजनं आपल्या मुलीचं नाव जीएसटी ठेवलं.

नंतर त्यानं हेही सांगितलं की, हे फक्त तिचं घरातलं नाव असेल.तिचं शाळेतलं नाव जन्मवेळ पाहून ठेवलं जाईल. पण हॉस्पिटलमध्ये असलेला प्रत्येकजण तिला या अनोख्या नावानेच ओळखतोय. हॉस्पिटलचा स्टाफ तिला सध्या या नावानेच हाक मारतोय. पूर्ण पाली शहरात या मुलीच्या नावाची चर्चा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 2, 2017 04:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading