मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /मुलाखतीला जायला पैसेही नव्हते, मजुराच्या पोरीनं मानली नाही हार; UPSCत टॉपची पोस्ट मिळवली

मुलाखतीला जायला पैसेही नव्हते, मजुराच्या पोरीनं मानली नाही हार; UPSCत टॉपची पोस्ट मिळवली

आयएएस श्रीधन्या सुरेश

आयएएस श्रीधन्या सुरेश

श्रीधन्या आर्थिकदृष्ट्या अत्यंत दुर्बल कुटुंबातून आल्या आहेत. त्यांचे वडील मनरेगामध्ये मजूर म्हणून काम करायचे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • New Delhi, India

नवी दिल्ली, 28 जानेवारी : दरवर्षी UPSC परीक्षेच्या निकाल लागल्यानंतर अशा अनेक संघर्षाच्या कहाण्या समोर येतात ज्या हृदयाला स्पर्श करतात आणि लोकांना कठीण परिस्थितीतही हार न मानण्याची प्रेरणा देतात. अशीच एक कहाणी आहे आयएएस श्रीधन्या सुरेश यांची. आयएएस श्रीधन्या सुरेश यांनी खऱ्या मेहनतीने आणि समर्पणाने कठीण परिस्थितीतही यश मिळवता येते हे सिद्ध केले आहे.

श्रीधन्या आर्थिकदृष्ट्या अत्यंत दुर्बल कुटुंबातून आल्या आहेत. त्यांचे वडील मनरेगामध्ये मजूर म्हणून काम करायचे आणि उरलेल्या काळात धनुष्यबाण विकून आपला उदरनिर्वाह चालवायचे. त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती एवढी हलाखीची होती की सरकारकडून जमीन मिळाल्यानंतरही त्यांच्या कुटुंबाला घर बांधता आले नाही.

अशा भयानक परिस्थितीतही, श्रीधन्या सुरेश यांनी 2018 मध्ये केवळ यूपीएससी परीक्षा उत्तीर्णच केली नाही, तर 410 वा क्रमांक मिळवला होता. यासोबतच UPSC परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या त्या केरळमधील पहिली आदिवासी मुलगीदेखील ठरल्या. UPSC परीक्षा देण्यापूर्वी श्रीधन्या यांनी अनुसूचित जाती विकास विभागात लिपिक म्हणूनही काम केले. यानंतर त्यांनी वायनाड येथील आदिवासी वसतिगृहात वॉर्डन म्हणून काम केले. येथूनच त्यांनी यूपीएससीची तयारी करण्याची प्रेरणा मिळाली.

श्रीधन्या यांनी 2016 आणि 2017 मध्ये UPSC परीक्षाही दिली होती. पण दोन्ही प्रयत्नांत त्यांना यश आले नाही. मात्र, अपयशाला हार न मानता, त्याने कठोर परिश्रम केले आणि 2018 मध्ये UPSC मध्ये 410 वा क्रमांक मिळवत यशाला गवसणी घातली आणि आपल्या कुटुंबाचा तसेच समाजाचा गौरव केला.

हेही वाचा - Success Story : IIT पास, UPSC मध्ये दुसरा क्रमांक, शेतकऱ्याची मुलगी झाली IAS अधिकारी

परिस्थिती अशी होती की, तिसर्‍या प्रयत्नात जेव्हा त्यांची मुलाखतीसाठी निवड झाली तेव्हा त्यांच्याकडे दिल्लीला येण्यासाठीही पैसे नव्हते. त्यानंतर मित्रांकडून पैसे मागून दिल्लीला जाऊन मुलाखत दिली. श्रीधान्या यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, त्या राज्यातील सर्वात मागास जिल्ह्यातून आल्या आहेत, जिथे एकही आदिवासी IAS अधिकारी नाही. त्यांनी येणाऱ्या पिढ्यांसाठी सर्व समस्यांवर मात करण्यासाठी प्रेरणा म्हणून काम करावे, अशी त्यांची इच्छा आहे. त्यांचा हा प्रवास आजच्या तरुणाईला नक्कीच प्रेरणादायी आहे.

First published:

Tags: Career, Ias officer, Inspiring story, Job, Upsc, Upsc exam