कोरोनाने बाप-लेकीलाही केलं लांब, नवजात लेकीचं तोंडही नाही पाहू शकला ऑफिसर

कोरोनाने बाप-लेकीलाही केलं लांब, नवजात लेकीचं तोंडही नाही पाहू शकला ऑफिसर

राजीव गेल्या तीन आठवड्यांपासून स्वत: च्या घराच्या गेस्ट रूममध्ये थांबले आहेत, ते संशयितांचा शोध घेत असलेल्या पथकात फील्ड ऑफिसर म्हणून तैनात आहेत.

  • Share this:

नोएडा, 07 एप्रिल : देशात कोरोनाने थैमान घातलं आहे. अशात संपूर्ण देशात लॉकडाऊन असल्यामुळे कधीही विचार केला नाही अशा गोष्टी समोर येत आहेत. अशा मनाला अगदी घर करणारी एक घटना समोर आली आहे. जेव्हा राजीव राय यांनी ऐकलं की, त्यांच्या घरात एक लहान बाळ जन्मला आलं आहे. तेव्हा त्यांचा आनंद गगणात मावेना. पण सगळ्यात वाईट म्हणजे ते त्यांच्या बाळाला आपल्या मांडीवर घेऊ शकत नाहीत किंवा ते त्याचा चेहराही नीट पाहू शकत नाही, कारण ते कोरोनाव्हायरस संक्रमणामुळे ते क्वारंटाईनमध्ये आहेत. ते आपल्या मुलीला तीन मीटर अंतरावरुन पाहू शकतात. राजीव गेल्या तीन आठवड्यांपासून स्वत: च्या घराच्या गेस्ट रूममध्ये थांबले आहेत, ते संशयितांचा शोध घेत असलेल्या पथकात फील्ड ऑफिसर म्हणून तैनात आहेत.

मुलगी व पत्नीलाही भेटू शकले नाही

राजीव राय म्हणाले की, तीन आठवड्यांपासून त्यांना आपली गर्भवती पत्नी आणि आठ वर्षाच्या मुलीला भेटता आलं नाही. ते घरी येतात आणि सरळ गेस्ट रूमकडे जातात. आता त्यांच्या घरी एक छोटा बाबू आला आहे. घरी सगळे खूप आनंदात आहेत. परंतु कोरोनामुळे ते कोणाकडेच जाऊ शकत नाहीत. ते नोएडा येथे तैनात आहे, जेथे उत्तर प्रदेशातील सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह प्रकरणे आढळली आहेत.

हे वाचा - महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 23 रुग्ण वाढले, कोरोनाबाधितांची संख्या 891 वर

लेकीला डोळेभरून पाहिलं नाही तोच कामावर परतले

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, राजीव यांनी सांगितले की, सोमवारी दुपारी जेव्हा आपल्या मुलीच्या जन्माची बातमी मिळाली तेव्हा ते थेट रुग्णालयात गेले. तिथे त्यांनी खोलीच्या दारातून काही वेळ मुलीला पाहिलं आणि त्यानंतर थेट कामावर परतले. संध्याकाळी ते पुन्हा दवाखान्यात गेले, तेव्हा डॉक्टरांनी त्यांना मुलगी व पत्नीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. यावर, त्यांनी पुन्हा आपल्या मुलीला खोलीच्या गेटवरुन पाहिलं आणि कामावर गेले.

हे वाचा - 'माझ्याशी लग्न कर नाहीतर कायमचं वर जायला तयार राहा'

'मी त्यांच्या जवळ जाणार नाही'

राय म्हणाले की, जोपर्यंत हा कोरोना संसर्ग नियंत्रित होत नाही आणि परिस्थिती सामान्य होत नाही तोपर्यंत तो आपली मुलगी व पत्नीजवळ जाणार नाही. ते म्हणाले की, लोकांपर्यंत मी माझ्या सेवा देत राहिलो ही माझी जबाबदारी आहे आणि म्हणूनच मी सतत काम करेन. ज्यामुळे मी माझ्या कुटुंबासाठी धोका बनू शकतो आणि म्हणूनच मी त्यांच्यापासून अंतर ठेवू राहणार आहे.

हे वाचा - बाळाला जगात येण्याची संधीच मिळाली नाही! डिलिव्हरी होण्याआधीच कोरोनामुळे महिलेचा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 7, 2020 12:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading