धक्कादायक! मुंबईत प्रेम प्रकरणाच्या संशयावरून बापाने मुलीला जिवंत जाळलं

बापानेच आपल्या 16 वर्षाच्या मुलीला जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jan 1, 2019 01:22 PM IST

धक्कादायक! मुंबईत प्रेम प्रकरणाच्या संशयावरून बापाने मुलीला जिवंत जाळलं

विजय राऊत, प्रतिनिधी

विरार, 01 जानेवारी : सोमवारी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अख्खी मुंबई उत्सहात असताना विरारमध्ये एक काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. बापानेच आपल्या 16 वर्षाच्या मुलीला जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

शहादा मूर्तिजा असं दखमी मुलीचं नाव आहे.  गंभाीर म्हणजे मुलीचं प्रेम प्रकरण असल्याच्या संशयावरून बापाने हे कृत्य केलं आहे. मुलगी फोनवर बोलते, तिचं कुणासोबत तरी प्रेम प्रकरण आहे. या संशयावरून बापाने अंगावर रॉकेल टाकून आपल्या पोटच्या गोळ्याला पेटवून दिलं.

हेही वाचा - PHOTOS: नागराजसाठी बिग बी पोहोचले थेट शिक्षकाच्या घरी आणि...

विरार पूर्वमधील गोपचर पाडा इथं सोमवारी रात्री 2 वाजता ही घटना घडली. यात मुलगी 70 टक्के भाजली असून तिच्यावर मुंबईतील केईएम रुग्णालयातमध्ये उपचार सुरू आहेत. मोहम्मद मूर्तिजा मंसूरी असं आरोपी बापाचं नाव आहे.

Loading...

दरम्यान, 'शहादा ही सतत मोबाईलवर बोलत असते. त्यामुळे रागाने तिच्या वडिलांनी तिचा मोबाईल फोडून टाकला. त्याच रागात तिने स्वतःला जाळून घेतलं' असं तिच्या आईने पोलिसांना सांगितलं आहे. तर शहिदावर सध्या मुंबईच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या संपूर्ण प्रकाराबाबत विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्या असून पोलिसांनी आरोपी बापाला ताब्यात घेतलं आहे. पुढील तपास विरार पोलीस करीत आहेत.


VIDEO: 'हेल्मेट घालून जिवंत राहणार असं कुठे लिहलंय', पुणेकरांच्या भन्नाट प्रतिक्रिया


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 1, 2019 01:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...