Home /News /news /

sangli : सांगली जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना ‘या’ अॅपवर नोंदणी केल्यामुळे आपत्तीच्या काळात मिळणार मदत

sangli : सांगली जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना ‘या’ अॅपवर नोंदणी केल्यामुळे आपत्तीच्या काळात मिळणार मदत

महाराष्ट्र शासनाच्या ई-पिक पाहणी ॲपद्वारे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची नोंद 7/12 वर करावी. (Maharashtra government e pik) ई-पिक पाहणी ॲपचा प्रभावी वापर व्हावा असे मंत्री जयंत पाटील म्हणाले

  सांगली 15 मे : मागच्या काही वर्षात सांगली, कोल्हापूर जिल्ह्याला महापूराचा (sangli flood affected farmers) फटका बसला. यामध्ये 2019 आणि 2021 साली महापूरात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देताना काही त्रुटी राहिल्या त्या त्रुटी दूर करण्यासाठी शासनाने ई पीक पाहणी (e pik pahani) नावाचे अॅप विकसीत केले. यामुळे शेतकऱ्यांनी शेतात (farmers) लावलेल्या पीकाची माहिती या अॅपमध्ये भरल्यास आपत्ती काळात नुकसान झाल्यावर त्याला मदत मिळण्यास सोपे जाणार आहे. दरम्यान सागंली जिल्ह्यातील खरीप हंगामाच्या आढावा बैठकीवेळी मंत्री जयंत पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना ई पीक पाहणी अॅपची माहिती सर्व शेतकऱ्यांना देण्याच्या सूचना केल्या.

  ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्र शासनाच्या ई-पिक पाहणी ॲपद्वारे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या  पिकांची  नोंद 7/12 वर  करावी. (Maharashtra government e pik)  ई-पिक पाहणी ॲपचा प्रभावी वापर व्हावा यासाठी  महसूल, कृषी, जलसंपदा विभाग व सांगली (sangli) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांची संयुक्त समिती तयार करण्यात यावी. या समितीच्या माध्यमातून ई-पिक पाहणी (e pik pahani) ॲपचा वापर वाढावा यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. यासाठी लागणारा निधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिला जाईल. तरी ई-पिक पाहणी ॲपचा प्रचार व प्रसार करावा. असे आदेश जलसंपदामंत्री जयंत पाटील (minister jayant patil) यांनी दिले. 

  ई-पिक पाहणी ॲपवर शेतकऱ्यांनी (farmer) आपल्या पिकांची नोंद केल्यास आपत्तीच्या काळात याचा अधिक फायदा होणार आहे. आपत्तीमुळे होणारे नुकसान याची आकडेवारी निश्चित करण्यास मदत होईल. यामुळे मदत देणे ही सोईचे होईल. तसेच शेतकऱ्यांना विमा, नुकसान भरपाई देणे शासनाला सोयीचे होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनीही ई-पीक पाहणी ॲपवर आपल्या पिकांची नोंद करावी असे आवाहन पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.

  हे ही वाचा : heat wave : अबब! या जिल्ह्यात तापमानाचा उच्चांक, 24 तासांत 46.5 अंश तापमानाची नोंद

  सांगली जिल्ह्यात खरीप हंगाम व्यवस्थितपणे पार पडावा यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक बी-बियाणे, खते, कीटकनाशके यांचा सुलभ व सुरळीतपणे पुरवठा व्हावा यासाठी आवश्यक ते सर्व नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. तसेच जिल्ह्यामध्ये फळ पिकविमा योजनेअंतर्गत बदल करण्यात आल्यामुळे जिल्ह्याला 23 कोटी रुपये विमाच्या लाभ मिळाला आहे. फळपिक विमा योजनेच्या नियामांमध्ये आणखीन सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केले जातील असेही ते यावेळी म्हणाले.

  सांगली (sangli) जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र 8 लाख 61 हजार हेक्टर असून, निव्वळ पिकाखालील क्षेत्र 5 लाख 76 हजार 903 हेक्टर आहे. वहीती खालील क्षेत्र 7 लाख 15 हजार 600 हेक्टर आहे. खातेदारांची संख्या 5 लाख 52 हजार 328 इतकी असून, खरीप क्षेत्र 3 लाख 56 हजार 754 हेक्टर आहे. खरीप गांवाची संख्या 633 असून रब्बी 2 लाख 20 हजार 149 हेक्टर आहे. रब्बी गावांची संख्या 103 आहे. एकूण सिंचनाखालील क्षेत्र 3 लाख 63 हजार 890 असून भूपृष्टवरील सिंचित क्षेत्र 2 लाख 80 हजार 747 तर ठिबक, तुषारद्वारे सिंचन क्षेत्र 56 हजार 700 हेक्टर आहे.

  हे ही वाचा : Monsoon Updates: मान्सूनची वेळेआधी हजेरी, 48 तासांत बंगालच्या उपसागरात होणार दाखल

  सांगली जिल्ह्यासाठी खरीप हंगाम 2022 बियांन्यांचे नियोजन केले असून खरीप 2022 साठी भात पिक 6 हजार 732 क्विंटल, ज्वारी 6 हजार 665 क्विंटल, बाजरी 2 हजार 20 क्विंटल, तूर 621 क्विंटल, मुग 327 क्विंटल, भूईमुग 1 हजार 468 क्विंटल, सुर्यफुल 15 क्विंटल, मका 6 हजार 698 क्विंटल, कापूस 8 क्विंटल, सोयाबीन 39 हजार 470 क्विंटल असे एकूण 64 हजार 24 क्विंटल बियाण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

  जिल्ह्यासाठी खरीप हंगाम सन 2022-23 साठी आवश्यक खते यांचे नियोजन करण्यात आले आसून युरीया 47 हजार 469 मे. टन, डीएपी 17 हजार 919 मे. टन, एमओपी 21 हजार 581 मे. टन, एसएसपी 20 हजार 561 मे. टन, एनपीके 44 हजार मे. टन असे एकूण 1 लाख 51 हजार 530 मे. टन आवंटन करण्यात आले आहे. अशी माहिती यावेळी कृषी विभागाकडून देण्यात आली.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Farmer, Jayant patil, Sangli (City/Town/Village), Sangli news

  पुढील बातम्या