VIDEO : निषेध म्हणून शेतकऱ्याने मोफत कांदा वाटला अन् लोकांनीही पिशव्यात भरभरून नेला

VIDEO : निषेध म्हणून शेतकऱ्याने मोफत कांदा वाटला अन् लोकांनीही पिशव्यात भरभरून नेला

संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी जळगावात मोफत कांदा विकून अभिनव आंदोलन केलं होतं.

  • Share this:

राजेश भागवत, प्रतिनिधी

जळगाव, 25 जानेवारी : कांद्याला हमीभाव मिळत नसल्यामुळे संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी जळगावात मोफत कांदा विकून अभिनव आंदोलन केलं होतं. परंतु, मोफत कांदा मिळत असल्यामुळे लोकांची एकच झुंबड उडाली होती. अक्षरश: पिशव्या आणि दुचाकीच्या डिक्कीत कांदा भरून नेत होते.

कांद्याला सध्या बाजारात कवडीमोल भाव मिळत आहे. कांदा विक्रीतून उत्पादनाचा खर्चही मिळत नसल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे.

त्यामुळे आज जळगाव जिल्ह्यात कांदे पिकाला हमीभाव मिळावा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टर भरून आणलेल्या कांद्याचं मोफत वाटप करुन शेतकऱ्यांनी अभिनव आंदोलन केलं. शेतकऱ्याला हेक्टरी 50 हजार रूपये आर्थिक मदत मिळावी, कांद्याला अनुदान रक्कम वाढवून मिळावी. कडधान्य, फळपिकं आणि कापूस यांना योग्य भाव द्यावा, कांदा उत्पादन खर्च निघेल इतपत भाव घोषित करावी, अशा या शेतकऱ्यांच्या मागण्या होत्या.

कवडीमोल कांदाही लोकांनी फुकट नेला

एकीकडे शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू होतं. तर दुसरीकडे फुकट मिळणारा कांदा घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाल्याचं बघायला मिळालं. मोफत कांदे वाटप होत असताना रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी आपली दुचाकी बाजूला लावून कांदे घेण्यासाठी एकच धावपळ सुरू केली. काही जण पिशव्यांमध्ये कांदा भरून नेत होते. तर काहीजण दुचाकीची डिक्कीत कांदे भरण्यास मग्न होते. एकीकडे संतप्त शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू होते तर दुसरीकडे फुकट्या लोकांची झुंबड असं विदारक दृश्य पाहण्यास मिळालं.

=============================================

First published: January 25, 2019, 4:36 PM IST

ताज्या बातम्या