लातूरमध्ये शेतकऱ्याच्या मुलीची आत्महत्या, लग्नाआधीच हुंडाबळी

लातूरमध्ये शेतकऱ्याच्या मुलीची आत्महत्या, लग्नाआधीच हुंडाबळी

भिसे वाघोली गावच्या शीतल वायाळ नावाच्या मुलीनं आत्महत्या केली.

  • Share this:

 15 एप्रिल : भिसे वाघोली गावच्या शीतल वायाळ नावाच्या मुलीनं आत्महत्या केली. तिनं आत्महत्येची जी कारणं दिलीयत त्यानं फक्त लातुरकरच नाहीत तर महाराष्ट्र हेलावून गेलाय.वडील शेतकरी आहेत, कर्जबाजारी आहेत, त्यातच त्यांना हुंडा द्यावा लागू नये म्हणून आत्महत्या करत असल्याचं तिनं चिठ्ठीत लिहिलंय.

काय लिहिलंय शीतलनं चिठ्ठीत?

"मी, शीतल व्यंकट वायाळ अशी चिठ्ठी लिहिते की, माझे वडील मराठा कुणबी कुटुंबात जन्मले, त्यांच्या शेतात सलग 5 वर्षांपासूनच्या नापिकीमुळे आमच्या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत नाजूक हलाखीची झाली आहे. माझ्या दोन बहिणींची लग्न छोटेखानी पद्धतीने करण्यात आली, परंतु माझे लग्न करण्यासाठी दोन वर्षांपासून बापाचं दारिद्र्य संपत नव्हतं. कुठल्याही बँकेचं किंवा सावकाराचं कर्ज माझ्या बापाला न मिळाल्याने माझं लग्न 2 वर्षांपासून थांबलं होतं. त्यामुळे मी माझ्या बापावरील वजन कमी करण्यासाठी व मराठा समाजातील रूढी परंपरा, देवाणघेवाण कमी करण्यासाठी आत्महत्या करत आहे. तरी मला व माझ्या कुटुंबाला समाजाने कुठलाही दोष देऊ नये.

                                                                    

शीतल वायाळ, भिसे वाघोली, जि. लातूर "

शीतलच्या आत्महत्येमुळे लातूर आणि सगळीकडे हळहळ आणि प्रथांविरोधात संताप व्यक्त होतोय.

आयबीएन लोकमतच्या बातमीनंतर नेते,मंत्र्यांना जाग आली आहे.लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी शीतलच्या कुटुंबियांची भेट घेतली  आणि शीतलच्या दोन्ही भावांच्या शिक्षणाची जबाबदारी निलंगेकरांनी स्वीकारली आहे. निलंगेकरांसह खासदार सुनील गायकवाड यांनी शीतलच्या घरी जाऊन विचारपूस केली आणि संध्याकाळी अशोक चव्हाण ,अमित देशमुखही भेट देणार आहे .

First published: April 15, 2017, 1:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading