मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दबाव वाढला, शरद पवार आणि राहुल गांधींसह 5 नेते राष्ट्रपतींना भेटणार

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दबाव वाढला, शरद पवार आणि राहुल गांधींसह 5 नेते राष्ट्रपतींना भेटणार

गेल्या 13 दिवसांपासून पंजाब आणि दिल्लीच्या सीमेवर हे आंदोलन होत असून त्यात पंजाबच्या शेतकऱ्यांचा सर्वात जास्त सहभाग आहे.

गेल्या 13 दिवसांपासून पंजाब आणि दिल्लीच्या सीमेवर हे आंदोलन होत असून त्यात पंजाबच्या शेतकऱ्यांचा सर्वात जास्त सहभाग आहे.

गेल्या 13 दिवसांपासून पंजाब आणि दिल्लीच्या सीमेवर हे आंदोलन होत असून त्यात पंजाबच्या शेतकऱ्यांचा सर्वात जास्त सहभाग आहे.

  • Published by:  Ajay Kautikwar
नवी दिल्ली 08 डिसेंबर: शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्र सरकारवरचा दबाव वाढतो आहे. हा दबाव वाढविण्यासाठी विरोधी पक्षांचं एक शिष्टमंडळ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहे. या शिष्टमंडळामध्ये राष्ट्रवादीचे शरद पवार(Sharad Pawar), काँग्रेसकडून राहुल गांधी (Rahul Gandhi), CPI (M)चे सीताराम येचुरी, CPIचे डी राजा आणि DMKचे टीकेएस एलनगोवन यांचा समावेश आहे. कोविड प्रोटोकॉलमुळे फक्त 5 नेत्यांनाच भेटीची परवानगी मिळाली आहे. शरद पवार यांनीही आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत याविषयीची माहिती दिली. या प्रश्नावर सर्व पक्ष मिळून भूमिका ठरविणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. संध्याकाळी 5 वाजता ही भेट होणार आहे. गेल्या 13 दिवसांपासून पंजाब आणि दिल्लीच्या सीमेवर हे आंदोलन होत असून त्यात पंजाबच्या शेतकऱ्यांचा सर्वात जास्त सहभाग आहे. केंद्र सरकारने मंजूर केलेली नवी कृषी विधेयकं परत घेण्यात यावीत यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलं आहे. सरकार आणि शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या असून त्यात तोडगा निघालेला नाही. 9 डिसेंबर रोजी शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात सहाव्यांदा चर्चा होणार आहे. यापूर्वी पाच वेळा झालेल्या चर्चेतून कोणताही निष्कर्ष आलेला नाही. त्यामुळे आता उद्या 9 डिसेंबर रोजी शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये नेमकी काय चर्चा होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान (Farmer Movement) आणखी एका शेतकऱ्याचा ह्रदयविकाराने मृत्यू (Farmer Death) झाला आहे. हा शेतकरी टिकरी बॉर्डरवर (Tikri Border) वर प्रदर्शनात सहभागी झाला होता. सोमवारी त्याची प्रकृती अचानक बिघडली होती. त्यानंतर त्यांना बहादुरगढ इथल्या एका हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं होतं. त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. उपचार सुरू असतानाच मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला. गेल्या 12 दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनात विविध कारणांमुळे 12 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
First published:

Tags: Rahul gandhi, Sharad pawar

पुढील बातम्या