इमतियाज अहमद, प्रतिनिधी
जळगाव, 17 मार्च : देशभरात राजकारण सुरू असताना जळगावमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जळगावच्या यावल तालुक्यातील मनवेल येथे एका शेतकऱ्याने शेतातील नापिकी, कर्ज आणि केळीला हमिभाव मिळत नसल्याने कंटाळून आत्महत्या केली आहे. देशात सध्या राजकीय वातावरण आहे त्यात हा घटनेनं जळगावमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
सुरेश भागवत पाटील (70) असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. त्यांनी स्वतःच्या शेतात विष प्राशन करून आपलं आयुष्य संपवलं आहे. सुरेश भागवत पाटील यांचा मृतदेह पिळोदा शिवारामध्ये रविवारी सकाळी आढळून आला. त्यानंतर या प्रकरणाची पोलिसांना माहिती देण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी सुरेश यांनी सेंट्रल बँकेकडून 2.90 लाखांचे कर्ज घेतलं होतं. त्याची परतफेड केळी विकून करणार असा त्यांचा संकल्प होता. परंतु, 3000 केळींची खोड कापणीयोग्य असताना त्याला भावच मिळाला नाही. त्यामुळे कर्जाचे पैसे देता आले नाही. कर्जाच्या ओझ्याखाली कोणताही मार्ग नसल्यामुळे त्यांनी आत्महत्या करण्याचा शेवटचा मार्ग स्वीकारला.
सुरेश यांच्या जाण्यामुळे संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या अशा जाण्यामुळे भागवत कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. तर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपसा करत आहे.
SPECIAL REPORT: जळगावात भाजपच्या नाना पाटलांना तिसऱ्यांदा उमेदवारी?