सगळ्या गावासाठी राबले पण पदरी पडली निराशा, झाडाला गळफास घेत शेतकऱ्याची आत्महत्या

सगळ्या गावासाठी राबले पण पदरी पडली निराशा, झाडाला गळफास घेत शेतकऱ्याची आत्महत्या

बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास शेतातील चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन संतोष यांनी आत्महत्या केली.

  • Share this:

बीड, 27 नोव्हेंबर: राजकीय सत्ता नाट्यामुळे राज्याचं वातावरण ढवळून निघालं आहे. अशात शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे मात्र सगळ्यांचं दुर्लक्ष झालं आहे. सरकार कोणाचंही आणा पण शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबणार नाहीत असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बीड जिल्ह्यातील पाटोदा शहराजवळील हनुमान वस्तीवर एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे.

संतोष राजाराम तांबे (वय-36वर्ष) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे नाव आहे. बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास शेतातील चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन संतोष यांनी आत्महत्या केली. एक एकर शेती असून दुष्काळ, नापीकी यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्याने कुटुंब कसं जगवावं, तसेच पाठ दुःखीमुळे त्रस्त होतं टोकाचे पाऊल उचलल्याचं नातेवाईकांनी सांगितलं.

इतर बातम्या - वर्गातली दंगामस्ती जीवावर बेतली, शुल्लक चुकीमुळे खास मित्राचा मृत्यू

संतोष यांच्या पश्चात दोन मुलं, पत्नी, आई, दोन भाऊ असा परिवार आहे. तर त्यांच्याकडे बुलढाणा अर्बन बँकेचे आणि खासगी देणे होते. त्यांच्या खिशात आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठीही सापडली. यात स्व.खर्चाने वस्तीवर केलेल्या रस्त्याचे बील निघालं नाही असादेखील उल्लेख आहे.

कर्जबाजारीपणा आणि आजाराचं कारण या चिठ्ठीमध्ये लिहिण्यात आलं आहे. दरम्यान, प्रशासनानेदेखील लक्ष दिले नाही हा उल्लेख संतोष यांनी पत्रात केला आहे. तर घरातील कर्ता पुरुष निघून गेल्याने संपूर्ण कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

First published: November 27, 2019, 9:48 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading