S M L

अन्नदाता रूसला; हजारो शेतकऱ्यांचा संपावर जाण्याचा निर्धार...

शेतकरी संपाची दिशा ठरवण्यासाठी नगर जिल्ह्यातल्या पुणतांबे गावात शेतकऱ्यांची विशेष ग्रामसभेला सुरूवात झाली आहे. आता आत्महत्या नाही, तर हक्कासाठी लढाईचा निर्धार बळीराजांनी केला आहे.

Samruddha Bhambure | Updated On: Apr 3, 2017 01:48 PM IST

अन्नदाता रूसला; हजारो शेतकऱ्यांचा संपावर जाण्याचा निर्धार...

03 एप्रिल : शेतकरी संपाची दिशा ठरवण्यासाठी नगर जिल्ह्यातल्या पुणतांबे गावात शेतकऱ्यांची विशेष ग्रामसभेला सुरूवात झाली आहे. आता आत्महत्या नाही, तर हक्कासाठी लढाईचा निर्धार बळीराजांनी केला आहे. या ग्रामसभेसाठी पुणतांबे गावात दीड हजार शेतकरी एकवटलेत.

पेरणीच्या तोंडावर संपावर जाण्याचा निर्णय या शेतकऱ्यांनी घेतला आहे. एक तर पिकत नाही आणि पिकलं तर सरकार त्याचे भाव भाडतं, त्यामुळे शेतकरी संकटात आहे. त्यावरचा जालीम उपाय म्हणून शेतकऱ्यांनी संपाचं हत्यार उपसल आहे. दुसरीकडे किसानपुत्र आंदोलनासारख्या संघटनांनी शेतकरीविरोधी कायदे हटवण्याची मागणी केलीय. त्याचीही सध्या जुळवाजुळव केली जातेय.

डॉक्टर संप करतात, वकिल संप करतात, थोडसं काही झालं की नोकरदार उठतो आणि संप करतो. परिस्थिती कितीही हलाखीची होवो शेतकरी मात्र ढग जमायला लागले की पेरणीला लागतो. या वर्षी नाही झालं तर पुढच्या वर्षी चांगलं पिकेल, चांगलं विकेल या आशेवर वर्षानुवर्षे चालतोय. पण हे चित्रं आता बदलत असून अहमदनगरचे शेतकरी संपावर जाण्याच्या तयारीत आहेत.तुरीची खरेदी बंद... टोमॅटो 10 रूपये किलो... मिर्चीच्या फडावर नांगर फिरवण्याची वेळ आली. परिणाम गेल्या दशकभरात लाखभर शेतकऱ्यांच्या आत्महत्या. कधी ओला दुष्काळ पडतो तर कधी कोरडा दुष्काळ. शेती पिकतच नाही. काबाडकष्ट करून पिकवली तर शेतकऱ्यांच्या मालाचे भाव सरकारच पाडतं. देशात तुरीचं विक्रमी उत्पादन झालं तर खरेदी बंद केली जाते, भाव पाडण्यासाठी आयात केली जाते, द्राक्ष, कांदा पिकला तरी निर्यातीवर बंदी आणली जाते. परिणामी शेतीमाल कवडीमोल भावानं विकावा लागतो. अनेक आंदोलनं झाली पण स्थिती काही बदलत नाहीये. शेवटी नगरच्या शेतकऱ्यांनी आता थेट संपावर जायचं ठरवलंय.

जुनच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात मान्सून दाखल होतो. गावोगावी शेतकरी पेरता होतो. पण येत्या 1 जुनपासून मातीत तिफनच टेकवायची नाही असा निर्धार नगर, औरंगाबादमधल्या जवळपास 40 गावच्या शेतकऱ्यांनी केलाय. त्याची सुरुवात पुणतांबे गावापासून होणार आहे. आज त्यासाठीच हजारो शेतकरी पुणतांबेत जमले आहेत.

पहिल्या टप्यात शेतकरी दूध बंद करणार आहेत, त्यानंतर भाजीपाला न विकण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. त्यानंतर फक्त स्वत:च्या घरादाराला पुरेल एवढच पिकवायचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. शेतकऱ्यांचा हा होऊ घातलेला संप ऐतिहासिक आहे. तो यशस्वी करण्यासाठी गावोगावच्या शेतकऱ्यांनी एकत्र येण्याची तयारी चालवलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 3, 2017 01:17 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close