वीज अंगावर पडून मायलेकाचा मृत्यू , नांदेड जिल्ह्यातील घटना

वीज अंगावर पडून मायलेकाचा मृत्यू , नांदेड जिल्ह्यातील घटना

वीज अंगावर पडून मायलेकाचा मृत्यू झाल्याची घटना उमरी तालुक्यातील हातनी इथे घडली आहे. सुशीला सुरने (वय- 30) आणि राजेश सुरने (वय- 4) अशी मृतांची नावे आहेत.

  • Share this:

नांदेड, 28 जून - वीज अंगावर पडून मायलेकाचा मृत्यू झाल्याची घटना उमरी तालुक्यातील हातनी इथे घडली आहे. सुशीला सुरने (वय- 30) आणि राजेश सुरने (वय- 4) अशी मृतांची नावे आहेत. सुशीला सुरने आणि राजेश शेतात काम करत असताना अंगावर वीज कोसळून दोघांचा जागीच मृत्यू झाला.

वीज कोसळून मेंढपाळ ठार..

दुसऱ्या एका घटनेत वीज कोसळून मेंढपाळाचा मृत्यू झाला आहे. मानोरा तालुक्यातील जामदरा घोटी शिवारात ही घटना घडली आहे. शुक्रवारी संध्याकाळी जामदरा घोटी परिसरात विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस सुरू झाला. वीज कोसळून पिंटू चिमा शिंदे (वय-28) याचा जागीच मृत्यू झाला. पिंटू शिंदे हा तरूण अडाण धरणाकडून आपल्या मेंढ्या गावाकडे आणत असताना त्याच्या अंगावर वीज पडली.

या परिसरात सोमठाणा येथील मेंढपाळांनी मेंढ्या चराईसाठी आणल्या आहेत.

पेरणी सुरू असतानाच वीज पडून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू

पेरणी करत असताना दोघांचा मृत्यू झाल्याची हृदय हेलावणारी घटना अकोल्याच्या बाळापूर तालुक्यातील बोराळा येथे घडलीय. 17 वर्षीय कपिल शेगोकर आणि 55 वर्षीय बाळू उमाळे असं मृत झालेल्या दोघांची नाव आहेत. दोन तीन दिवसांपासून पावसाने अकोला जिल्ह्यात चांगलाच जोर धरला आहे. यामुळे अकोला जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पेरणी सुरवात केली. बाळापूर तालुक्यातही पेरण्या सुरू झाल्या आहेत.

बाळापूर तालुक्यातील बोराळा शेतशिवारात दुपारच्या वेळी पेरणी सुरू असताना, विजेच्या कडकडाटात ढग दाटून आले. यावेळी शेतात पेरणी करत असलेल्या बाळू उमाळे आणि कपिल शेगोकर यांच्या अंगावर वीज कोसळली, यात ते दोघेही गंभीर भाजल्या गेले. दोघांनाही तातडीने अकोल्यातील सरोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले.

विदर्भाला पाहावी लागणार वाट

मुंबईसह परिसरात सध्या जोरदार पाऊस पडतोय, विदर्भातही काही भागात तुरळk पावसाचा अंदाज असून, तीन दिवसानंतर विदर्भात मुसळाधार पाऊस पडेल, असा अंदाज नागपूर प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवलाय. सध्या विदर्भात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे तर सगळ्यांना प्रतिक्षा आहे ती दमदार पावसाची मात्र त्यासाठी तीन दिवस वाट पाहावी लागेल असं मत नागपूरच्या हवामान विभागाचे संचालक मोहनलाल शाहू यांनी व्यक्त केलं.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुंबई, पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात चांगला पाऊस सुरू झाला. मात्र विदर्भ अजुनही कोरडाच आहे. पाऊस येईल या आशोने शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या मात्र जून महिना संपत आला असला तरी पावसाची काही चिन्ह दिसत नव्हती. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालाय. तर पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईत दमदार पाऊस झालाय.

गच्चीतून पडलेल्या चिमुकलीसाठी 'तो' ठरला देवदूत; VIDEO VIRAL

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 28, 2019 09:17 PM IST

ताज्या बातम्या