लक्ष्मीपूजनाच्या आदल्यादिवशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर कर्जमाफीचे पैसे जमा होणार

लक्ष्मीपूजनाच्या आदल्यादिवशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर कर्जमाफीचे पैसे जमा होणार

कर्जमाफीचे पैसे कधी खात्यात जमा होणार याविषयीची उत्सुकता अखेर संपलीय. येत्या 18 तारखेला म्हणजेच बुधवारी पहिल्या टप्प्यातील कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. लक्ष्मीपूजनाच्या आदल्यादिवशी बळीराजाच्या बँक खात्यावर ही कर्जमाफीची रक्कम जमा होणार असल्याने शेतकऱ्यांची दिवाळी गोड जाणार आहे.

  • Share this:

प्रफुल्ल साळुंखे, विशेष प्रतिनिधी

मुंबई, 16 ऑक्टोबर : कर्जमाफीचे पैसे कधी खात्यात जमा होणार याविषयीची उत्सुकता अखेर संपलीय. येत्या 18 तारखेला म्हणजेच बुधवारी पहिल्या टप्प्यातील कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. लक्ष्मीपूजनाच्या आदल्यादिवशी बळीराजाच्या बँक खात्यावर ही कर्जमाफीची रक्कम जमा होणार असल्याने शेतकऱ्यांची दिवाळी गोड जाणार आहे. कर्जमाफी देण्यासाठी मुंबईत राज्य सरकारच्यावतीने एका सोहळ्याचंही आयोजन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते राज्यातील काही प्रातिनिधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा करण्यात येणार आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना देखील या कर्जमाफी सोहळ्यासाठी निमंत्रित केलं जाण्याची शक्यता आहे.

कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात येण्यासाठी तारिख पे तारीख पुढे सरकरत होती. राज्य सरकारनंही दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा होईल, असं आश्वासन दिलं होतं, असं असताना ग्रामपंचायत निवडणूक, बॅंकांनी आकडेवारी द्यायला केलेला उशिर अशा कारणांमुळे सरकारवर टीकेची झोड उठली होती. त्यानंतर आज अखेर कर्जमाफीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासंदर्भात सरकारनं नक्की केलंय.

राज्यात 79 लाख शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र असल्याचं राज्यसरकारन जाहीर केलं होतं. त्यानंतर कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची संख्या अंदाजे 70 लाखांपर्यत होईल, अशीही एक शक्यता होती. पण काही बँकांनी उशीर केल्याने सर्वच पात्र शेतकऱ्यांची यादी एकाच वेळी प्रसिध्द होणार नसल्याचं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलंय. प्रत्येक जिल्हयात ज्या ज्या शेतकऱ्यांची माहिती पूर्ण आहे. तसंच बॅंकांनी आकडेवारी दिली आहे, त्याच शेतकऱ्यांना पहिल्या टप्यात कर्जमाफी मिळणार असल्याचं आता स्पष्ट झालंय.

शेतकरी कर्जमाफीचे ठळक मुद्दे -

- बॅंकांनी यापूर्वी सरकारला सादर केलेली कर्जदार शेतकऱ्यांची संख्या - 89 लाख 20 हजार

- प्रत्यक्षात कर्जमाफीसाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची संख्या - 56 लाख 69 हजार

- राज्यात अंदाजे 30 हजार कोटी रुपयांची शेतकरी कर्जमाफी होणार

- पहिल्या टप्यात म्हणजेच 18 नोव्हेंबरला अंदाजे 20 टक्के शेतकऱ्यांच्याच बँक खात्यात पैसे जमा होणार

- यानंतर प्रत्येक पाच दिवसांनी पुढच्या टप्प्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील

- 20 हजार ते 40 हजार रुपयांपर्यंत कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक असेल

- 40 हजार ते 75 हजार कर्जमाफी असलेल्या शेतकऱ्यांची संख्या दुसऱ्या क्रमांकावर असेल

- दीड ते 2 लाखांपर्यंत कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची संख्या दहा लाखांपेक्षाही कमी

- नियमित कृषी कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पंचवीस हजार जमा होणार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 16, 2017 10:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading