दुष्काळामुळं पाहुण्यांना सांगतो लेकीचं लग्न पुढच्यावर्षी करू', डोळ्यांत पाणी आणणारी शेतकऱ्याची व्यथा

दुष्काळामुळं पाहुण्यांना सांगतो लेकीचं लग्न पुढच्यावर्षी करू',  डोळ्यांत पाणी आणणारी शेतकऱ्याची व्यथा

मारुती भोजने या 65 वर्षाच्या शेतकऱ्यावर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळाला आहे. बहिणींचं लग्न कसं करू? कर्ज कसं फेडू? या चिंतेनं कर्ता मुलगा हद्य विकाराच्या झटक्याने मरण पावला.

  • Share this:

बीड, 15 मे: बीड जिल्ह्यातील वाघे बाभूळगाव गावातील हसत्या-खेळत्या भोजने कुटुंबाला दुष्काळाची नजर लागली. मारुती भोजने या 65 वर्षाच्या शेतकऱ्यावर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळाला आहे. बहिणींचं लग्न कसं करू? कर्ज कसं फेडू? या चिंतेनं कर्ता मुलगा हद्य विकाराच्या झटक्याने मरण पावला.

अशोक  भोजने असं मुलाचं नाव होतं. मागच्यावर्षी 1 मे रोजी त्याचा विवाह केला. अशोक कुटुंब चालवत होता. 'बहिणींचं लग्न चांगलं करायचं' असं म्हणून दाखवायचा पण गावच्या जत्रेत आला, गावाकडे शेतीची  परिस्थिती पाहिली आणि थक्क झाला. कर्ज कसं फेडायचं? बहिणींचा विवाह कसा करायचा? या टेन्शनमुळे त्याला हद्यविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.

मुलाला अशा पद्धतीने गमावल्यानंतर मुलीचं लग्न आणि संपूर्ण घराची जबाबदारी मारुती यांच्यावर आली. खरंच, दुष्काळ इथल्या लोकांच्या जगण्या-मारण्यावर खोलवर परिणाम करतोय. अर्थकारणापासून कौटुंबीक नातेसंबंधांपर्यंत सर्व काही दुष्काळामुळे बाधित झालं आहे.

हेही वाचा : SPECIAL REPORT: 'पोरांची पोटं दुखतात पण तरी मिळेल ते किडे पडलेलं पाणी प्यावं लागतं'

दुष्काळावर मार्ग निघणार का?

केज तालुक्यातील वाघे बाभूळगाव गावातील अल्पभूधारक मारुती भोजने यांना 5 मुली आणि 1 मुलगा असा परिवार आहे. 4 मुलींची लग्न कशीबशी केली. त्यात मुलगा अशोक मुंबई महानगरपालिकेत सुरक्षा गार्ड म्हणून नोकरीला लागला. याचा त्यांना फार आनंद झाला होता. मुलाचं लग्न करायचं म्हणून कर्ज काढून घर बांधलं. पण बांधलेल्या या घरात आणि लग्नाच्या घाईत दुष्काळाने मात्र आयुष्यातले रंग काढून घेतले असं भोजने कुटुंबीय सांगतात.

घरात 22 वर्षांची उपवर मुलगी आहे. यावर्षी शेतात कापूस आणि सोयाबीन लावला. यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर मुलीचं लग्न होईल. त्यात मुलाचा मृत्यू झाला. त्यामुळे मारुती भोजने यांच्यावर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

खरंतर अनेक कुटुंब दुष्काळाच्या झळा सहन करत आहेत. शासन 'उपाययोजना करत आहोत' असं सांगत असलं तरी झालेली नुकसान भरपाई तोकड्या मदतीने किंवा अनुदानाने भरून निघणारी नाही. कदाचीत समाजातील दानशूर हातांनी अशा लोकांना माणुसकीच्या भूमिकेतून मदत केलीतर थोडं ओझं हलकं व्हायला मदत नक्कीच होईल.

VIDEO: 'तू झक्कास दिसतेस' म्हणताच तरुणीने युवकाला चपलेनं धुतलं

First published: May 15, 2019, 2:38 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading