बळीराजासमोर 'मोठं' संकट, ग्राहकांना दरवाढीचा फटका मात्र व्यापाऱ्यांची चांदी!

बळीराजासमोर 'मोठं' संकट, ग्राहकांना दरवाढीचा फटका मात्र व्यापाऱ्यांची चांदी!

लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी चाळीत कांदा साठवून ठेवला होता तो खराब होऊन सडू लागल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.

  • Share this:

मनमाड, 27 ऑगस्ट : शेतकऱ्यांच्या समोरील संकटं काही संपता-संपत नाही आहेत. यंदा उशिरा दाखल झालेला पाऊस त्यात हवामानत सतत होणारे बदल यामुळे शेतकरी आता हतबल झाला आहे. लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी चाळीत कांदा साठवून ठेवला होता तो खराब होऊन सडू लागल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. पावसाची रिपरिप आणि बदलत्या हवामानाचा फटका चाळीत साठवून ठेवलेल्या कांद्याला बसत असल्याचं बोललं जात आहे

चार महिन्यापूर्वी कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली होती. त्यामुळे पुढे भाव वाढतील या आशेवर मनमाड, लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी चाळीत कांदा साठवून ठेवलेला होता. दोन आठवड्यापासून कांद्याची आवक कमी तर मागणी जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात आता साठवून ठेवलेला कांदा खराब झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

या सगळ्याचा परिणाम म्हणजे कांद्याच्या भावात मोठी वाढ झाली आहे. सध्या कांद्याला प्रति क्विंटल सरासरी 2300 रुपयेपर्यंत भाव मिळत आहे. भावात वाढ झाल्याचं पाहून शेतकऱ्यांनी चाळीत साठवून ठेवलेला कांदा काढण्यास सुरुवात केली. मात्र, बदलत्या हवामानामुळे चाळीतील निम्मा कांदा खराब झाल्याचं पाहून शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.

शेतकऱ्याचं सगळ्यात मोठं नुकसान, कोल्हापूर आणि सांगलीच्या महापुरात तब्बल 9000 जनावरांचा मृत्यू

कोल्हापूर आणि सांगलीमध्ये ऑगस्टच्या पहिल्या 10 दिवसांमध्ये महापुराने थैमान घातलं. यात संपूर्ण नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं. या महापुरात तब्बल 9000 जनावरांचा मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे. मृत्यू झालेल्या जनावरांमध्ये बहुतांश जनावर दुभती आहे. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांसाठी हे सर्वात मोठं नुकसान आहे.

इतर बातम्या - खळबळजनक! रस्त्यात तरुणीवर धारदार शस्त्राने हल्ला; चेहरा, पाठीवर केले सपासप वार

शेतकऱ्यांचं हे नुकसान लक्षात घेत या दोन्ही जिल्ह्यातील पुरग्रस्त शेतकऱ्यांना गाई आणि म्हशी दान देण्याससाठी भोसरीकर पुढे सरसावले आहेत. पुरगस्त शेतकऱ्यांना 300 गाई म्हशींचं वाटप केलं जाणार असून त्यातील पहिल्या टप्प्यातील गाई आणि वासरांचं दान करण्यात आलं आहे. या विशेष मदतीमुळे दोन्ही जिल्ह्यातील दूध विक्रेते असल्याने या दुभत्या गाईकडून मिळणार दूध ते विकू शकतील. ज्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होणार आहे. या उपक्रमाचं सर्वत्र कौतूक केलं जातं आहे.

इतर बातम्या - राम शिंदे हे बॅनर मंत्री, रोहित पवारांची झणझणीत टीका

तर तिकडे चंद्रपूर जिल्ह्यातील चिमुर तालुक्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं आहे. चिमूर-ब्रम्हपुरी-सिंदेवाही-नागभीड या तालुक्यात पावसाने कहर केला आहे. चिमूरच्या चिखलापार या गावाला पुराच्या पाण्याचा वेढा घातला आहे. उमा नदीच्या पाण्यात जवळपास 200 ग्रामस्थ अडकले असल्याची माहिती देण्यात आली आहे. पाऊस सध्या मंदावला  असला तरी प्रशासनाने या लोकांना गावाबाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे.

VIDEO : माल तोच पॅकजिंग वेगळं, सुप्रिया सुळेंचा गयारामांना टोला

Published by: Renuka Dhaybar
First published: August 27, 2019, 7:25 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading