कर्जाचा बोजा नाही झेपला, शेतकरी पती-पत्नीने सोबतच विष पिऊन संपवलं आयुष्य

कर्जाचा बोजा नाही झेपला, शेतकरी पती-पत्नीने सोबतच विष पिऊन संपवलं आयुष्य

अकोल्यात पती-पत्नीने शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली आहे.

  • Share this:

कुंदन जाधव, प्रतिनिधी

अकोला, 01 डिसेंबर : कर्जाच्या ओझ्यामुळे शेतकऱ्यांचं आत्महत्या करण्याचं प्रमाण वाढलं आहे. अकोल्यामध्ये असाच आत्महत्येचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अकोल्यात पती-पत्नीने शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली आहे.

कर्जबाजारी पणामुळे आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.  50 ते 60 हजाराच कर्ज या दांपत्याच्या डोक्यावर होतं. ते फेडता न आल्याने या दोघांनी शेतात विष घेऊन आत्महत्या केली.  गांधीग्राम येथील ही घटना आहे.

शेख उमर शेख मन्नान (वय ४७) आणि नाजेमा बी शेख उमर (वय ४३) असं या पती-पत्नीचं नाव आहे.

या संपूर्ण घटनेमुळे अवघा अकोला हादरला आहे. शेतीत काबाडकष्ट करायचं आणि त्यातून नफा मात्र शुन्य मिळतो. त्यात घर खर्च आणि डोक्यावरच कर्ज या सगळ्यात यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.

Loading...

गावकऱ्यांनी या दांपत्याचा मृतदेह शेतात पाहिला आणि याबद्दल पोलिसांनी माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळावरून मृतदेह ताब्यात घेतला आहे तर तो नजिकच्या स्थानिक रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

दरम्यान, पोलीस आता या प्रकरणाचा कसून तपास करत आहे. या शेख कुटुंबीयांची चौकशी होणार असल्याचंही सांगण्यात येत आहे. तर  स्थानिकांचीही विचारपूस करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

तर या दांपत्याच्या जाण्याने संपूर्ण शेख कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे तर संपूर्ण अकोल्यात शोककळा पसरली आहे.


VIDEO : भररस्त्यावर सपासप वार करून तरुणाची हत्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 1, 2018 01:01 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...