अपंग मुलगी अन् कर्ज परतफेडीची चिंता... शेतकऱ्याची आत्महत्या

अपंग मुलगी अन् कर्ज परतफेडीची चिंता... शेतकऱ्याची आत्महत्या

कर्ज परतफेड कशी करावी? हा प्रश्‍न त्यांच्यासमोर होता. कर्ज फेडण्याच्या विवंचनेत भाऊराव यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.

  • Share this:

इम्तियाज अहमद,(प्रतिनिधी)

भुसावळ,25 नोव्हेंबर: जामनेर तालुक्यातील तोंडापूर येथे नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून 67 वर्षीय शेतकऱ्याने शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भाऊराव आनंदा अपार असे शेतकऱ्याचे नाव आहे. आपला रुमाल, घड्याळ, वीस रुपयाची नोट आणि पायातील बुट विहिरीच्या कठड्यावर ठेऊन भाऊराव यांनी उडी घेऊन आत्महत्या केली.

अपंग मुलगी अन् कर्ज परतफेडीची चिंता...

भाऊराव आनंदा अपार यांची तोंडापूर शिवारात पाच एकर शेतजमीन आहे. शेतात काबाड कष्ट करून देखील हाती आलेले पीक वाया गेले. त्यामुळे कर्ज परतफेड कशी करावी? हा प्रश्‍न त्यांच्यासमोर होता. कर्ज फेडण्याच्या विवंचनेत भाऊराव यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. त्यांना एक अपंग मुलगी असून तिची देखभाल करणे, एका मुलाचे लग्न कसे करायचे, ही चिंता देखील त्यांना सतावत होती. सकाळी कापूस वेचणीसाठी आणि पाणी काढायला गेलेल्या महिलांच्या हा प्रकार लक्षात आला.

सदर घटनेचा पहुर पोलिसांतर्फे पंचनामा करण्यात आला. त्यावेळी पोलिस हवालदार किरण शिंपी, नवल हटकर, पोलिस पाटील सुलोचना पाटील आणि गावकरी उपस्थित होते. शवविच्छेदनासाठी मृतदेह जामनेर रुग्णालयात नेण्यात आला.

दरम्यान, परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला. शेतातील काढणीला आलेले सोयाबीन, कापूस, बाजरी मका या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऐन दिवाळीत पावसाने शेतकऱ्यांच्या स्वप्नाची 'होळी' केली होती. जळगाव जिल्ह्यातील हजारो शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. सरकारने तात्काळ मदत दिली तर शेतकऱ्यांला आधार मिळू शकतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 25, 2019 09:33 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading