29 मार्च : शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि 19 आमदारांचे निलंबन मागे घ्यावे, या प्रमुख मागण्यांसाठी सर्व विरोधीपक्ष आता रस्त्यावर उतरणार असून चांदा ते बांदा संघर्षयात्रा काढण्यात येत आहे. पळसगाव येथून या यात्रेचा शुभारंभ होणार असून ४ एप्रिल रोजी पनवेल येथे समारोप होणार आहे.
या यात्रेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खा. सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री अनिल देशमुख, रमेश बंग, आ. सुनील केदार, नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, अतुल लोंढे सहभागी होणार आहेत.
अधिवेशन सुरू असताना विधानसभेचे विरोधी पक्षाचे आमदार पुढचे 6 दिवस 14 जिल्ह्यांमध्ये ही संघर्ष यात्रा नेणार आहेत. सरकारने अर्थसंकल्पिय अधिवेशनात शेतकऱ्यांची कर्जमाफीची घोषणा न केल्याने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा संकल्प या यात्रेच्या माध्यमातून करणार असल्याचे विरोधकांचं म्हणणं आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा