भयंकर! भटक्या कुत्र्यांनी दीड वर्षाच्या मुलाचं तोंड ओरबडलं, पडले 250 टाके

भयंकर! भटक्या कुत्र्यांनी दीड वर्षाच्या मुलाचं तोंड ओरबडलं, पडले 250 टाके

भटक्या कुत्र्यांनी (Stray Dogs) अडीच वर्षाच्या निरागस मुलावर हल्ला केला. कुत्र्यांनी मुलाच्या चेहऱ्यावर खूप ओरखडलं असल्यामुळे त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती देण्यात आली आहे.

  • Share this:

फरीदाबाद, 12 जानेवारी : हरियाणाच्या फरीदाबादमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. इथल्या पलवली (Palwali Village) गावात भटक्या कुत्र्यांनी (Stray Dogs) अडीच वर्षाच्या निरागस मुलावर हल्ला केला. कुत्र्यांनी मुलाच्या चेहऱ्यावर खूप ओरखडलं असल्यामुळे त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती देण्यात आली आहे. मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिषपाल असं मुलाच्या वडिलांचे नाव असून ते रिक्षा चालवतात. अशा परिस्थितीत बळी पडलेल्या कुटुंबाच्या आर्थिक मदतीसाठी बरेच लोक पुढे आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे साडेसहाच्या सुमारास पलवली गावात साडेपाच वर्षांचा निर्दोष मुलगा खेळत होता, त्यावेळी पाच भटक्या कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला. कुत्र्यांनी त्याच्या नाक आणि डोळ्याचा वरचा भाग खाल्ला. यातून मुलाला गंभीर दुखापत झाली. त्याला सेक्टर -16 येथील मेट्रो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चार तासाच्या उपचारादरम्यान त्याला भयंकर! भटक्या कुत्र्यांनी दीड वर्षाच्या मुलाचं तोंड ओरबडलं, पडले 250 टाके आहेत. यापैकी 150 टाके फक्त चेहऱ्यावर आहेत. याशिवाय तोंड, नाक, डोळे आणि शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर टाके पडले आहेत.

इतर बातम्या - आईला पाहताच तो रडू लागला, निर्भया प्रकरणातल्या आरोपींना वाटतेय मृत्यूची भीती

हिंदुस्थानमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, शस्त्रक्रियेदरम्यान शरीराच्या इतर भागातून त्वचा घेऊन मुलाचे नाक पुन्हा तयार केले गेले आहे. याशिवाय डोळ्याची बाहुलीदेखील कृत्रिम मार्गाने तयार केली गेली. प्लास्टिक सर्जन डॉ कामेश्वर यांनी सांगितले की त्यांनी मुलाची शस्त्रक्रिया विनामूल्य केली आहे. तसेच, त्याने पीडितेच्या कुटूंबाला मदत करण्याचे आवाहन केले आहे. त्याचवेळी आरडब्ल्यूए सचिव नीरज चावला यांनी सांगितले की, आतापर्यंत जवळपास 50 हजार रुपयांच्या सहकार्याची रक्कम आली आहे.

इतर बातम्या - भीमा नदीच्या पुलावर झाला भीषण अपघात, यात्रेला जाणाऱ्या बाप-लेकीचा जागेवरच मृत्यू

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 12, 2020 05:21 PM IST

ताज्या बातम्या