फरीदा गहिवरल्या.. म्हणाल्या सुषमांमुळे गुलामीच्या आयुष्यातून झाली सुटका!

फरीदा गहिवरल्या.. म्हणाल्या सुषमांमुळे गुलामीच्या आयुष्यातून झाली सुटका!

अंबरनाथमध्ये राहणाऱ्या फरीदा खान यांची परदेशात गुलामीच्या जगण्यातून तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी 1 मे 2018 रोजी सुटका केली होती.

  • Share this:

गणेश गायकवाड, (प्रतिनिधी)

अंबरनाथ, ऑगस्ट- तब्बल तीन महिने परदेशात गुलामाचे आयुष्य जगणाऱ्या अंबरनाथच्या फरीदा खान याना भारतात सुखरूप परत आणण्यासाठी सुषमा स्वराज यांनी विशेष लक्ष दिले होते. सुषमा स्वराज यांचे मंगळवारी निधन झाले. ही बातमी फरीदा यांना समजताच आता परदेशात अशा नरक यातना भोगणाऱ्यांना कोण मदत करणारय असे सांगत त्यांनी सुषमा स्वराजयाच्या सोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

अंबरनाथमध्ये राहणाऱ्या फरीदा खान यांची परदेशात गुलामीच्या जगण्यातून तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी 1 मे 2018 रोजी सुटका केली होती. फरिदाची ओमान देशातून सुटका करण्यासाठी फरिदाच्या पतीने सुषमा स्वराज यांना ट्वीट केले होते. या ट्वीटला सुषमा स्वराज यांनी तात्काळ उत्तर देत मदतीचे आश्वासन देऊन या प्रकरणात विशेष लक्ष दिले. यावेळी महिला आयोगाच्या मदतीने फरीदाची ओमान देशातून सुटका करून त्यांना सुखरूप भारतात आणले. भारतात सुखरूप परत असल्यावर फरिदाने सुषमा स्वराज याचे भेट घेत त्याचे आभार मानले. या भेटीचे फोटो पाहताना आपण फक्त सुषमा स्वराज यांच्यामुळे मायदेशात परतलो. त्या आपल्यात नाहीत याचे खूप जास्त दुःख असल्याचे फरीदा म्हणाल्या.

सन 2018 मध्ये फरीदा कामासाठी ओमानला गेल्या होत्या. मात्र, त्यांना पाठवणाऱ्या एजंटने फरीदा यांना एका अरबी कुटुंबाच्या घरी कामाला लावले. याठिकाणी हे अरबी कुटुंब फरीदा यांना गुलामाप्रमाणे वागणूक देत होते. 20 दिवस काम केल्यानंतर त्यांनी मायदेशी भारतात जाण्याची इच्छा त्या अरबी कुटुंबीयांसमोर व्यक्त केली होती. मात्र त्यांनी तिला पाठवायला नकार दिला. अखेर कसे बसे आपल्या पतीशी संपर्क करून फरीदा यांनी आपल्यावर बेतलेली हकीकत पतीला सांगितली. पतीने लगेच परराष्ट्रखाते, महिला अयोगाशी संपर्क करून आपल्या पत्नीला भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले. त्यावेळी तत्कालीन परराष्ट्र सुषमा स्वराज यांनी या प्रकरणात विशेष लक्ष देऊन फरीदा यांच्या सारख्या 12 महिलांची ओमानमधून सुटका केली होती. सुषमा स्वराज नसत्या तर आपल्या पत्नीला मायदेशात आणू शकलो नसतो, असे फरीदा यांचे पती अब्दुल खान यांनी सांगितले.

VIDEO: सुषमा स्वराज यांच्या निधनानं हळहळ; नेत्यांनी व्यक्त केला शोक

Published by: Sandip Parolekar
First published: August 7, 2019, 4:58 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading