फरहान अख्तरने दिली Good News, या तारखेला करणार शिबानी दांडेकरशी लग्न

शिबानी, फरहानच्या मुलांसोबतही खूप वेळ घालवते. यामुळेच फरहानने लवकरात लवकर लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 6, 2019 06:40 PM IST

फरहान अख्तरने दिली Good News, या तारखेला करणार शिबानी दांडेकरशी लग्न

गेल्या काही दिवसांपासून शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तर एकमेकांना डेट करत आहेत. पण, अजूनही दोघांनी अधिकृतरित्या त्यांच्या नात्याला कबूली दिली नाही.

असं असलं तरी अनेकदा दोघं त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात. आता फरहानने त्यांच्या लग्नाबद्दल एक मोठा खुलासा केला आहे.

नुकताच फरहान अभिनेत्री भूमी पेडणेकरच्या टेप कास्ट सीझन २ या शोमध्ये गेला होता. यावेळी भूमी फरहानसोबत ‘डोन्ट प्ले’ हा गेम खेळली. यात एका टेपमध्ये कॅसेट लावून शिबानीचा आवाज ऐकवला.

Loading...

यात शिबानी फरहानला प्रश्न विचारते की, ‘फरहान आपण लग्न एप्रिलमध्ये करणार की मे महिन्यात करणार आहोत.. मी फार संभ्रमात आहे.’ शिबानीच्या या प्रश्नाचं उत्तर देताना फरहान म्हणतो की, ‘आपण कदाचीत एप्रिल किंवा मेमध्ये लग्न करू.’

शिबानी, फरहानच्या संपूर्ण कुटुंबाच्या फार जवळ आहे. ती फरहानच्या मुलांसोबतही खूप वेळ घालवते. यामुळेच फरहानने लवकरात लवकर लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. आता फरहानच्या या वक्तव्यामुळे ही बॉलिवूडची हट जोडी एप्रिलमध्ये लग्न करणार की मेमध्ये हे लवकरच कळेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 6, 2019 06:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...