मराठमोळ्या प्रेयसीसाठी फरहान अख्तरने केली कविता

मराठमोळ्या प्रेयसीसाठी फरहान अख्तरने केली कविता

रणवीर सिंग- दीपिका पादुकोण यांच्या मुंबईतील रिसेप्शनला फरहान आणि शिबानी दोघंही एकत्र रेड कार्पेटवर हातात हात घेऊन आले होते.

  • Share this:

रणवीर, प्रियांका आणि अनुष्का शर्मा यांच्या लग्नानंतर आता अजून एक स्टार गुडघ्याला बाशिंग लावून तयार आहे. हा स्टार दुसरा कोणी नसून अभिनेता, दिग्दर्शक आणि गायक फरहान अख्तर आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शिबानी दांडेकरसोबतच्या रिलेशनशिपमुळे तो चांगलाच चर्चेत आहे. व्हॅलेंटाइन वीकमध्ये दोघांनी एकमेकांसोबतचा फोटो शेअर केला आहे.

या फोटोमध्ये फरहान अख्तरने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून दोघांचा फोटो शेअर केला आहे. फोटोत शिबानी आणि फरहान काही निवांत क्षण एकमेकांसोबत घालवताना दिसत आहेत. एवढंच नाही तर फरहानने शिबानीसाठी एक खास कविताही केली आहे. ही कविता दोघांमधलं प्रेम किती दृढ आहे ते दाखवून देते.

फरहान अख्तरने दोघांचा फोटो शेअर करत म्हटलं की,

तुम मुस्कुराओ जरा,

चिराग जला दो जरा,

अंधेरा हटा दो जरा,

रोशनी फैला दो जरा..

फरहान अख्तरच्या चाहत्यांना त्यांचा हा फोटो आणि कविता कमालिचा आवडला. फरहानशिवाय शिबानी दांडेकरनेही हा फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केला.

रणवीर सिंग- दीपिका पादुकोण यांच्या मुंबईतील रिसेप्शनला फरहान आणि शिबानी दोघंही एकत्र रेड कार्पेटवर हातात हात घेऊन आले होते. अनेकदा दोघांना परदेशात एकत्र फिरताना पाहण्यात आले आहे. दोघांनी आपल्या नात्याचा स्वीकार केला नसला तरी नकारही दिलेला नाही.

VIDEO VIRAL : रजनीकांत यांनी मुलीच्या लग्नात असा धरला ठेका, की सर्वजण पाहातच राहिले

First published: February 12, 2019, 12:54 PM IST

ताज्या बातम्या