Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • पुढील दीड तासात ओडिशामध्ये फानी चक्रीवादळाचं भयानक रूप, पाहा ग्राउंड रिपोर्ट
  • पुढील दीड तासात ओडिशामध्ये फानी चक्रीवादळाचं भयानक रूप, पाहा ग्राउंड रिपोर्ट

    News18 Lokmat | Published On: May 3, 2019 10:03 AM IST | Updated On: May 3, 2019 10:03 AM IST

    पुरी (ओडिशा), 03 मे : ओडिशा, आंध्रप्रदेश आणि केरळच्या समुद्रकिनारी आज फानी वादळ धडकलं. सकाळी 10 ते 12 च्या दरम्यान हे वादळ ओडिशाच्या किनाऱ्य़ाला धडकणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. पण काही वेळापूर्वीच हे वादळ इथं येऊन धडकलं. पुरीमध्ये पावसाचा जोर वाढला असून 175 किलोमीटर वेगानं वारे वाहताहेत. पूर्व समुद्रकिनारी भाग पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूलाही या चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या भागातून जाणाऱ्या 223 ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. तर भुवनेश्वर आणि कोलकाता एअरपोर्ट बंद करण्यात आलं आहे. पुरी इथं नेमकी काय स्थिती आहे ते जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी शुभकांत यांच्याकडून.