PHOTOS : फानी चक्रीवादळामुळे या रेल्वे स्टेशनची झाली वाताहत

PHOTOS : फानी चक्रीवादळामुळे या रेल्वे स्टेशनची झाली वाताहत

'फानी' वादळाचा तडाखा भुवनेश्वरला चांगलाच बसला. या वादळामुळे इथलं रेल्वे स्टेशन पार उद्ध्वस्त झालं आहे. वादळाचा जोर आता ओसरला असून बचावकार्य वेगाने सुरू आहे.

  • Share this:

ओडिशामध्ये फानी चक्रीवादळामुळे भुवनेश्वरचं रेल्वे स्टेशन पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे. या स्टेशनचं छप्पर, भिंती आणि होर्डिंग्ज वादळामुळे उडून गेली.

ओडिशामध्ये फानी चक्रीवादळामुळे भुवनेश्वरचं रेल्वे स्टेशन पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे. या स्टेशनचं छप्पर, भिंती आणि होर्डिंग्ज वादळामुळे उडून गेली.

जगन्नाथपुरी आणि पुरीजवळच्या भागांत 245 किमी प्रतितास एवढ्या प्रचंड वेगाने वारे वाहत होते. भुवनेश्वरला या वादळाचा जोरदार तडाखा बसला

जगन्नाथपुरी आणि पुरीजवळच्या भागांत 245 किमी प्रतितास एवढ्या प्रचंड वेगाने वारे वाहत होते. भुवनेश्वरला या वादळाचा जोरदार तडाखा बसला.

भुवनेश्वर रेल्वे स्टेशनजवळ झाडं पडली आणि विजेचे खांबही मोडून पडले. हे वादळ ओसरेपर्यंत लोकांना रेल्वेस्टेशनच्या परिसरात जायला मनाई करण्यात आली आहे.

भुवनेश्वर रेल्वे स्टेशनजवळ झाडं पडली आणि विजेचे खांबही मोडून पडले. हे वादळ ओसरेपर्यंत लोकांना रेल्वे स्टेशनच्या परिसरात जायला मनाई करण्यात आली आहे.

भुवनेश्वर रेल्वे स्टेशनच्य प्लॅटफॉर्म नंबर 1 चं छप्पर पूर्णपणे उडून गेलं. काही ठिकाणी बस आणि क्रेन उलटण्याच्याही घटना घडल्या.

भुवनेश्वर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर 1 चं छप्पर पूर्णपणे उडून गेलं. काही ठिकाणी बस आणि क्रेन उलटण्याच्याही घटना घडल्या.

फानी वादळाच्या बचावकार्यासाठी NDRF ची पथकं ठिकठिकाणी तैनात करण्यात आली आहेत. रेल्वे प्रशासन ढिगारे हटवण्याचं काम करतं आहे.

फानी वादळाच्या बचावकार्यासाठी NDRF ची पथकं ठिकठिकाणी तैनात करण्यात आली आहेत. रेल्वे प्रशासन ढिगारे हटवण्याचं काम करतं आहे.

फानी वादळाचा जोर आता ओसरला आहे पण या वादळात 10 जणांचा बळी गेला.

फानी वादळाचा जोर आता ओसरला आहे पण या वादळात 10 जणांचा बळी गेला. चक्रीवादळामुळे सुमारे 220 ट्रेन रद्द कराव्या लागल्या. हे वादळ पश्चिम बंगालमध्येही पोहोचलं असून तिथे जोरदार पाऊस होतो आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 4, 2019 05:59 PM IST

ताज्या बातम्या