चक्रीवादळात दिला मुलीला जन्म; नाव ठेवलं ‘फानी’

फानी चक्रीवादळावरून आईनं आपल्या मुलीचं नाव फानी असं ठेवलं आहे.

News18 Lokmat | Updated On: May 3, 2019 03:21 PM IST

चक्रीवादळात दिला मुलीला जन्म; नाव ठेवलं ‘फानी’

भुवनेश्वर, 03 मे :  ओडिसा, पश्चिम बंगालला फानी चक्रीवादळाचा तडाका बसला. यावेळी सुरक्षेच्या कारणास्तव लाखो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. प्रशासनानं साऱ्या परिस्थितीला सामोरं जाण्याची तयारी केली होती. त्याचे परिणाम दिसून आले. कारण, महत्त्वाचा प्रश्न होता तो गरोदर स्त्रियांचा. जवळपास 541 गरोदर स्त्रियांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं होतं. यावेळी जन्मलेल्या एका मुलीचं नाव चक्क 'फानी' असं ठेवण्यात आलं.Loading...

चक्रीवादळाचा जोर असताना सकाळी 11 वाजून 03 मिनिटांनी 32 वर्षाच्या महिलेनं मुलीला रेल्वे हॉस्पिटलमध्ये जन्म दिला. त्यानंतर तिनं आपल्या लेकीचं नाव हे 'फानी' ठेवलं आहे. सदर महिला रेल्वे कामगार आहे. दरम्यान, आई आणि बाळ दोघंही सुखरूप आहेत.


आंतरराष्ट्रीय दहशतवादी मसूद अजहरला आता पाकिस्तानचा दणका

3 महिलांची सुखरूप प्रसुती

फानी चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता 541 गर्भवती महिलांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर 3 महिलांची प्रसुती झाली असून मुलं आणि आई सुखरूप आहेत. ओडिसामध्ये जवळपास 4000 एनडीआरएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत.

फानी चक्रीवादळ धडकणार याचा खबर लागताच डॉक्टर देखील सज्ज झाले होते. त्यानंतर 541 गर्भवती महिलांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. यावेळी 3 महिलांना या प्रसुती वेदना सुरू झाल्या. अखेर डॉक्टरांच्या टीमनं त्याची सुखरूप प्रसुती केली.फानी चक्रीवादळामुळे ओडिशातील जवळपास 10,000 गावांना आणि 52 शहरांना फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गृह मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 11.5 लाख लोकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलं आहे.


VIDEO: बुरहान वाणीच्या साथीदाराचा खात्मा, चकमकीचा EXCLUSIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 3, 2019 03:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...