Home /News /news /

शायर हरपला, राहत इंदौरी यांचं कोरोनामुळे निधन

शायर हरपला, राहत इंदौरी यांचं कोरोनामुळे निधन

प्रख्यात उर्दू कवी, लोकप्रिय शायर आणि गीतकार राहत इंदौरी यांचे निधन झाले आहे.

    इंदुर, 12 ऑगस्ट : प्रख्यात उर्दू कवी, लोकप्रिय शायर आणि गीतकार राहत  इंदौरी यांचे निधन झाले आहे. ते 70 वर्षांचे होते.  इंदौरी यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती होती. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. इंदुरमधील लोकप्रिय शायर आणि गीतकार राहत इंदौरी यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. खुद्द राहत इंदौरी यांनी आज सकाळी स्वत: ट्वीट करून माहिती दिली. त्यांचे हे ट्वीट आता अखेरचे ठरले आहे. 'अचानक लक्षणे जाणवू लागल्यामुळे सोमवारी रुग्णालयात जाऊन कोरोनाची चाचणी केली होती. आता त्याचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे, त्यामुळे ऑरबिंदो हॉस्पिटलमध्ये दाखल झालो आहे' असं इंदौरी म्हणाले होते. तसंच, 'मी आता हॉस्पिटलमध्ये दाखल झालो आहे, माझ्यासाठी नक्की प्रार्थना करा. पण एक विनंती आहे की, माझ्या घरी फोन करू नका, माझ्या तब्येतीबद्दल मी ट्वीटर आणि फेसबुकवर याची माहिती देत राहिल' असं भावनिक आवाहनही त्यांनी केलं होतं. परंतु, ऑरबिंदो हॉस्पिटलमध्ये दाखल होऊन दिवस उलटला नाही तेच  राहत इंदौरी यांच्या निधनाची बातमी आली. कोरोनामुळे इंदौरी यांचे निधन झाले. हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर निमोनियामुळे त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांचा मुलगा युवा शायर सतलज राहत यांनी सांगितले की, 'नियमित तपासणीसाठी फक्त ते घरातून बाहेर पडत होते. मागील पाच सहा दिवसांपासून त्यांची प्रकृती अस्वस्थ होती. डॉक्टराच्या सल्ल्यानंतर एक्स रे काढण्यात आला होता. त्यात निमोनिया झाल्याचे निदान झाले होते. त्यानंतर त्याचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले असता कोरोनाची लागण झाल्याचं कळालं.' राहत इंदौरी यांना ह्रदयविकार आणि मधुमेह होता. त्यामुळे त्यांची प्रकृती आज आणखी खालावली होती. त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यामुळे आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. राहत इंदौरी यांचा जीवन प्रवास राहत इंदौरी यांचा  1 जानेवरी 1950 रोजी एका गरीब घरात जन्म झाला होता. राहत यांचे वडील रिफअत उल्लाह 1942 मध्ये सोनकछ देवास जिल्ह्यातून इंदुर इथं आले आणि स्थायिक झाले. राहत याचे लहानपणीचे नाव कामिल होते. नंतर ते बदलून  राहत उल्लाह ठेवण्यात आले होते. राहत इंदौरी याचं आयु्ष्य खडतर आणि संघर्षमय होतं. त्यांचे वडील हे रिक्षा चालवून घराचा उरनिर्वाह करत होते. त्यानंतर त्यांनी मिलमध्येही काम केले होते. 1939 ते 1945 च्या दुसऱ्या महायुद्धात जगभरात आर्थिक मंदीची लाट आली होती. त्यामुळे मिल बंद पडली. त्यामुळे राहत इंदौरी यांच्या वडिलांची नोकरी गेली. त्यामुळे राहत यांच्या कुटुबीयांना बेघर होण्याची वेळ आली. 'मुन्नाभाई एमबीबीएस'साठी लिहिली गाणी राहत इंदौरी यांनी  बरकतुल्लाह विद्यापीठातून उर्दूमध्ये एमए केले होते.  त्यानंतर भोज विद्यापीठातून त्यांनी  उर्दू साहित्यामध्ये पीएचडी केली. राहत यांनी मुन्नाभाई एमबीबीएस, मीनाक्षी, खुद्दार, नाराज, मर्डर, मिशन काश्मीर, करीब, बेगम जान, घातक, इश्क, जानम, सर, आशियां आणि मैं तेरा आशिक सारख्या सिनेमांसाठी गाणी लिहिली.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या