Home /News /news /

Nashik : 'बुधा हलवाई'ची जिलेबी पाहूनच सुटतं तोंडाला पाणी; एकदा खाल तर खातच बसाल, कुरकुरीत जिलेबीचा VIDEO पहा

Nashik : 'बुधा हलवाई'ची जिलेबी पाहूनच सुटतं तोंडाला पाणी; एकदा खाल तर खातच बसाल, कुरकुरीत जिलेबीचा VIDEO पहा

बुधा

बुधा हलवाई जिलेबी, नाशिक

नाशकातील बुधा हलवाईची कुरकुरीत जिलेबी पाहूनच तोंडाला पाणी सुटते. या जिलेबीचं वैशिष्ट्य हे आहे की, 10 दिवस ही जिलेबी कुरकुरीत राहते. त्याची चवही स्वादिष्ट आहे. इथं उपवासाची जिलेबीदेखील मिळते.

  नाशिक, 26 जून : नाशिक तसं पाहिलं तर अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. तसं ते खाद्यपदार्थांसाठीदेखील प्रसिद्ध आहे. शहरातील भद्रकालीमधील तिवंदा चौकातील, प्रसिद्ध बुधा हलवाई जिलेबी (Famous Budha Halwai Jilebi in Nashik) फक्त पाहिली जरी तोंडाला पाणी सुटते. इतकंच नाही तर एकदा खाल्ली की, चव कायमची लक्षात राहतेच राहेत. चला तर आज आपण 70 वर्षांचा परंपरा जोपासत ग्राहकांना सेवा देणाऱ्या या स्वादिष्ट बुधा हलवाई जिलेबी (Jilebi) पाहुया... बुधाजी वाघ यांनी 1956 साली या बुधा हलवाई जिलेबी दुकानाची स्थापना केली आहे. तर आजतागायत हे जिलेबी दुकान खवय्यांसाठी खुल आहे. दररोज शेकडो ग्राहक या दुकानात येत असतात. सन उत्सव काळात तर या दुकानात पाय ठेवायलादेखील जागा नसते, इतकी गर्दी होते. याचं वैशिष्ट्य हे की, आषाढी एकादशी आणि महाशिवरात्रीला या दुकानात स्पेशल उपवासाची जिलेबी मिळते. उपवासाची जिलेबी ही बटाट्यांपासून बनवलेली असते. त्याला ग्राहकांची मोठी पसंती असते. बुधा हलवाई जिलेबीची खास वैशिष्टय 1) जिलेबी शुद्ध वनस्पती तुपात बनवली जाते. 2) ग्राहकांना खाण्यास जिलेबी गरम गरम दिली जाते. 3) जिलेबी 10 दिवस कडक राहते, मऊ पडत नाही. त्यामुळे जिलेबी पार्सल नेण्यावर ग्राहकांचा भर अधिक असतो. 4) साखरेच्या पाकात जायफळ आणि केशर मसाला टाकला जात असल्यामुळे जिलेबी चविष्ट लागते. 5) शिळी जिलेबी ग्राहकांना दिली जात नाही. बुधा हलवाई जिलेबी कशी बनवली जाते? एक दिवस अगोदर मैदा भिजवला जातो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी वनस्पती तुपात जिलेबी काढली जाते. साखरेच्या पाकात टाकण्याच्या अगोदर पाकात, जायफळ आणि केशरच मिश्रण केलं जातं. त्यानंतर पाकात टाकून जिलेबी काढली जाते. त्यानंतर ग्राहकांना दिली जाते. वाचा : Akola : पुण्यातील सिनेस्टार्सच्या आवडत्या DSP पाणीपुरीची अकोलेकरांना भुरळ; पहा या चविष्ट पाणीपुरीचा VIDEO शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या जिलेबीला ग्राहकांची मोठी पसंती आहे. आम्ही जेव्हा बुधा हलवाई जिलेबी दुकानाला भेट दिली. तेव्हा तिथे जिलेबी खात असलेल्या ग्राहकांची मत जाणून घेतली. ग्राहक सांगतात की,  आम्ही तब्बल 30 ते 35 वर्षापासून या ठिकाणी जिलेबी खाण्यासाठी येत आहे. इथल्या जिलेबीसारखी चव कुठेच नाही. स्वादिष्ट आणि कुरकुरीत इथली जिलेबी असते. गरमा गरम खायला मिळते. त्यामुळे  नाशिकमध्ये जिलेबी म्हटलं की बुधा हलवाई हे आमचं हक्काचं ठिकाण आहे. नाशिकमध्ये बुधा हलवाई जिलेबीचे दुकानतिवंदा चौक, भद्रकाली मंदिराच्या मागे, जुने नाशिक येथे आहे. मालकांशी संपर्क करायचा असेल तर, 9822119190 या क्रमांकावर वसंत वाघ यांना संपर्क साधू शकता.

  गुगल मॅपवरून साभार...

  वाचा : Pune: पुण्याच्या या हटके मिसळीचा VIRAL VIDEO पाहिला असेल, आता पाहा त्यामागची गोष्ट या दुकानाचे मालक वसंत वाघ म्हणतात की, "ग्राहक हेच आमचे देव आहेत. त्यांची इच्छा अपेक्षा पूर्ण केली. म्हणजे आम्हाला सार काही मिळाल्यासारखं वाटतं. आम्ही ग्राहकांना कधीच नाराज करत नाही. आषाढी एकादशी आणि महाशिवरात्रीला अनेक ग्राहकांचा उपवास असतो. त्यामुळे या काळात आम्ही उपवासाची जिलेबी बनवतो. त्याला ही ग्राहकांचा भरघोस प्रतिसाद असतो. बुधा हलवाई जिलेबी हे खवय्यांच हक्काचं ठिकाण आहे. अनेक खवय्ये तर विदेशातदेखील जिलेबी पार्सल घेऊन जातात. या दुकानाची शाखा कुठे ही नाही. त्यामुळे जिलेबी खायची असेल तर तुम्हाला या दुकाना नक्की भेट द्यावी लागते."
  First published:

  Tags: Food, Nashik, Recipie, Tasty food

  पुढील बातम्या