मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

या पिवळ्या रंगाच्या 'जर्मन शेफर्ड'ला जगभरात पसंती, पिकाचू म्हणून VIDEO व्हायरल

या पिवळ्या रंगाच्या 'जर्मन शेफर्ड'ला जगभरात पसंती, पिकाचू म्हणून VIDEO व्हायरल

कुत्र्याच्या पिल्लाचा रंग तुम्ही काळा, पांढरा तर पाहिला असेल मात्र तुम्ही कधी एका पिवळ्या(lime green) रंगाच्या कुत्र्याच्या पिल्लाला पाहिलं आहे का?

    कॅरोलिना 17 जानेवारी:  कुत्राचे पिल्लू म्हटले तर तुमच्या - आमच्या नजरेसमोर येते ते नाजुक, सुंदर, गोड असे लहानशे पिल्लू(puppy). कुत्र्याच्या पिल्लाचा रंग तुम्ही काळा, पांढरा तर पाहिला असेल मात्र तुम्ही कधी एका पिवळ्या(lime green) रंगाच्या कुत्र्याच्या पिल्लाला पाहिलं आहे का? कदाचित नसेलच पाहिले. मात्र असेच एक पिवळ्या रंगाचे कुत्र्याचे पिल्लू जन्माला आले आहे. नॉर्थ कॅरोलिनामधील एका कुटुंबामध्ये पाळीव कुत्रीने पिवळ्या रंगाच्या पिल्लाला जन्म दिला आहे. ते पिल्लू पिकाचु सारखे CUTE दिसत आहे. कुटुंबानी त्या  पिल्लाचे नाव ‘हल्क’ असे ठेवले आहे. शाना स्टैमी आणि त्यांच्या कुटुंबाचे असे म्हणणे आहे की, त्याच्या पांढऱ्या जर्मन शेफर्ड जिप्सी ने शुक्रवारी आठ सुंदर पिल्लांना जन्म दिला. त्यानंतर ट्विटरवर एका व्यक्तीने या पिल्लाचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओला सोशल मिडियावर चांगलीच पसंती मिळत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कुत्र्याच्या पिल्लाचा रंग पिवळा आहे. त्या पिल्लाला पाहून सोशल मीडियावर सर्व लोक आश्चर्याचकित झाले. त्यावर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया सुद्धा येत आहेत. त्यातील काहींना तर ते पिल्लू पिकाचू सारखा दिसत आहे. या पिल्याच्या आगळ्यावेगळ्या रंगावर प्राण्यांच्या डॉक्टरांचे असे म्हणणे आहे की, कुत्र्याच्या पिल्लाचा असा वेगळा रंग त्याच्यासाठी हानिकारक नाही. जसे  कुत्र्याचे पिल्लू मोठे होईल तसा तो रंग देखील हल्का होत जाईल.
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    Tags: World news

    पुढील बातम्या