S M L

'जिवंतपणी नाही निदान मेल्यावर तरी आम्हाला एकत्र ठेवा', प्रेमी युगुलाची आत्महत्या

सगळ्यात धक्कादायक म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी दोघांनी चिठ्या लिहल्या होत्या. त्यात आमच्या मृत्युस कुणालाही जबाबदार धरू नका असं लिहण्यात आलं होतं.

Updated On: Apr 8, 2019 04:01 PM IST

'जिवंतपणी नाही निदान मेल्यावर तरी आम्हाला एकत्र ठेवा', प्रेमी युगुलाची आत्महत्या

बब्बू शेख, प्रतिनिधी

मनमाड, 08 एप्रिल : प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मनमाडमध्ये समोर आला आहे. घरच्यांनी लग्नास नकार दिल्याने निराश झालेल्या प्रेमी युगुलाने गळफास घेऊन आत्महत्त्या केली आहे. सटाणा तालुक्यातील लाखमापूरमधील ही घटना आहे. या संपूर्ण घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

एकाच समाजाचे असताना केवळ मुलाचे शिक्षण कमी असल्या कारणावरून घरच्यांनी लग्नास नकार दिला. त्यामुळे निराश होऊन प्रेमी युगुलाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्त्या केली. आत्माराम दळवी आणि सुनिता गांगुर्डे असं या प्रेमी युगुलाचे नाव आहे. निराशेमध्ये या दोघांनीही आपलं आयुष्य संपवलं आहे.


आत्मारामचं ४थी पर्यंत शिक्षण झालं होतं. तर सुनिता ही एफ.वाय.बीए.चं शिक्षण घेतं होती. एकाच समाजाचे आणि शेजारी राहणारे आत्माराम आणि सुनिताचे प्रेमसंबंध होते. परंतू शैक्षणिक तफावतीमुळे दोघांच्या घरच्यांचा लग्नास विरोध होता. त्यामुळे त्यांनी आत्महत्त्या केली.


सगळ्यात धक्कादायक म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी दोघांनी चिठ्या लिहल्या होत्या. त्यात आमच्या मृत्युस कुणालाही जबाबदार धरू नका असं लिहण्यात आलं होतं. बरं इतकंच नाहीतर तर, 'जिवंत असताना आम्हाला एकत्र येऊ दिलं नाही पण गेल्यानंतर आम्हाला एकाच ठिकाणी ठेवा. आमच्या आत्म्याला शांती लाभेल' असंही चिठ्ठीत लिहण्यात आलं आहे.

Loading...

या संपूर्ण प्रकराणाची माहिती मिळताच पोलिसांनी या प्रकरणाच कसून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. तर पोलीस आता या प्रकरणात कसून चौकशी करत आहेत.


VIDEO : शिवसेना खासदारांनी जात काढल्यावर अमोल कोल्हेंचा जाहीर सभेतून पलटवार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 8, 2019 04:01 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

  • I agree to receive emails from NW18

  • I promise to vote in this year's elections no matter what the odds are.

    Please check above checkbox.

  • SUBMIT

Thank you for
taking the pledge

Vote responsibly as each vote
counts and makes a difference

Click your email to know more

Disclaimer:

Issued in public interest by HDFC Life. HDFC Life Insurance Company Limited (Formerly HDFC Standard Life Insurance Company Limited) (“HDFC Life”). CIN: L65110MH2000PLC128245, IRDAI Reg. No. 101 . The name/letters "HDFC" in the name/logo of the company belongs to Housing Development Finance Corporation Limited ("HDFC Limited") and is used by HDFC Life under an agreement entered into with HDFC Limited. ARN EU/04/19/13618
T&C Apply. ARN EU/04/19/13626

Live TV

News18 Lokmat
close